भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात
Indian cricketer Yuzvendra Chahal Married Dhanashree Verma

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने मंगळवारी धनश्री वर्मासोबत लग्न केले. चहलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. आयपीएलच्या 13 व्या सीझनपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता. आयपीएल दरम्यान धनश्री युजवेंद्रच्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) सामना पाहण्यासाठी युएईलाही पोहोचली.

या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  आणि चाहत्यांनीही या दोघांच्या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे धनाश्री भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबरपैकी एक आहे  आणि तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांच्या आवडीचा आहे  धनाश्री एक डान्सर तर आहे सोबतच कोरिओग्राफर देखिल आहे. तीची स्वतःची एक डान्सिंग अकॅडमी आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोघांचे अभिनंदन केले. बीसीसीआयने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे की, 'तुम्ही दोघेही तुमच्या संपूर्ण आयुष्यात आनंदी रहा.

ऑगस्टमध्ये झाला होता साखरपुडा

यावर्षी ऑगस्टमध्ये चहल आणि धनश्रीचा साखरपूडा झाला होता. यानंतर, युएई मधील आयपीएलच्या 13 व्या सत्रात धनश्री चहलची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सपोर्ट करतानाही दिसली.

आणखी वाचा:

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com