देशाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या या भारतीय क्रिकेटपटूने 'कोच' सोबत केलं लग्न

टीम इंडियाला (Team India) आपल्या नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक (Under-19 World Cup) जिंकून देणारा उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला आहे.
देशाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या या भारतीय क्रिकेटपटूने 'कोच' सोबत केलं लग्न
Unmukt ChandDainik Gomantak

टीम इंडियाला (Team India) आपल्या नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक (Under-19 World Cup) जिंकून देणारा उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला आहे. 21 नोव्हेंबर रोजी त्याने लग्न केले आहे. उन्मुक्त चांद (Unmukt Chand) की दुल्हनिया बनलेल्या मुलीचे नाव सिमरन खोसला (Simran Khosla) आहे, ती फिटनेस आणि न्यूट्रिशन कोच आहे. उन्मुक्तने गुपचूप लग्न केले, ज्यामध्ये फक्त त्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. लग्नात वर बनलेल्या उन्मुक्तने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती तर वधूने पारंपारिक कुमाऊनी पिचोरा परिधान केला होता. सिमरनने मेकअपही अगदी साधा केला आहे. सिमरन खोसला वयाने उन्मुक्त चंदपेक्षा 5 महिने आणि 14 दिवसांनी लहान आहे. तिचा जन्म 9 सप्टेंबर 1993 रोजी झाला. उन्मुक्तने काही काळापूर्वी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो सध्या अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये (American Cricket League) सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघासोबत खेळत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्याला या लीगच्या मेलबर्न रेनेगेड्सने करारबद्ध केले आहे. बिग बॅश लीग खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू असेल.

Unmukt Chand
Team Indiaला मोठा धक्का ! मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटीव्ह

दरम्यान, उन्मुक्त चंदने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला आहे. त्याला आयपीएलमध्ये दिल्ली संघासोबत खेळण्याची संधीही मिळाली, मात्र यादरम्यान त्याला उत्तम कामगिरी करता आली नाही. नंतर तो आयपीएलमधून (IPL) बाहेर पडला. हळूहळू त्याला दिल्लीच्या रणजी संघातूनही वगळण्यात आले. यानंतर त्याने उत्तराखंडच्या संघाकडून रणजी खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर त्याने अचानक भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

No stories found.