Indian Hockey Team चा कर्णधार मनप्रीत लवकरच होणार पिता
मनप्रीत सिंगने (Manpreet Singh) पत्नी इली नजवा सिद्धिक ((Illi Saddique) सोबत शेअर केले बेबी बंप बंपचा फोटोDainik Gomantak

Indian Hockey Team चा कर्णधार मनप्रीत लवकरच होणार पिता

पत्नी इली नजवा सिद्धिक (Illi Saddique) सोबत शेअर केले बेबी बंपचा फोटो

भारताचा हॉकीचा (Indian Hockey Team) कर्णधार मनप्रीतने त्याची पत्नी इली नजवा सद्दीक (Illi Saddique) त्याच्यासोबत उभी असलेली आणि तिचा बेबी बंप (Baby Bump) दाखवत असलेला फोटो पोस्ट केला आहे. भारतीय हॉकी ऑलिम्पियन मनप्रीत सिंगने (Manpreet Singh) शुक्रवारी घोषणा करताना सांगितले की, मी आणि इली आम्ही दोघे पुढच्या महिन्यात आमच्या घरी येणाऱ्या आमच्या बाळाची वाट बघत आहोत.

मनप्रीतने काल संध्याकाळी इन्स्टाग्रामवर ही घोषणा केली. त्याने लिहिले की , “जर तुम्हाला माहित नसेल तर आता तुम्हाला समजले पाहिजे ! नोव्हेंबरमध्ये एक भव्य अशी गोष्टीची आमच्या जीवनात सुरुवात होणार आहे.” जोडप्याने समान टी-शर्ट घालून ट्विनिंग करत फोटोशूट केले. पार्श्वभूमीवर भिंतीवर लटकलेल्या चांदी आणि पांढऱ्या फुग्यांसह मागे 'बेबी' लिहिलेले होते.

आई इलीनेही पोस्ट लिहिताना टिप्पणी दिली की, “मी अलीकडेच एमआयए (मिसिंग इन ॲक्शन) आहे, कारण मी गर्भवती आहे ! आमचं छोटं बाळ नोव्हेंबरमध्ये #babyontheway आमच्या पॅचवर येईल.

मनप्रीत सिंगने (Manpreet Singh) पत्नी इली नजवा सिद्धिक ((Illi Saddique) सोबत शेअर केले बेबी बंप बंपचा फोटो
IPL 2021: पंजाबच्या कोलकत्यावरील विजयाने दिल्लीची 'बल्ले बल्ले'

यावर्षी 17 डिसेंबर रोजी मनप्रीत व इली हे जोडपे आपला पहिली मॅरेज ॲनिवर्सरी साजरी करणार आहेत. त्यांच्या लग्नाला जालंधरच्या गुरुद्वारामध्ये आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर गेल्यावर्षी लग्न झाले होते. इली 2012 मध्ये मनप्रीतला पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून भेटली होती, जेव्हा तो मलेशियाला हॉकी खेळण्यासाठी गेला होता.

मिथापूर येथील मूळ गावी राहणारा मनप्रीत, जालंधरमध्ये आपल्या कुटुंबीयांसह, मित्रांसोबत आणि आसपासच्या लोकांना भेटण्यासाठी वेळ घालवत आहे कारण त्याने भारतीय हॉकी संघाचा कर्णधार म्हणून टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकून देशाला गौरव मिळवून दिला होता.

Related Stories

No stories found.