जर्मनी ते युक्रेन पर्यंत भारतीय खेळाडूंचा डंका; सचिनही म्हणाला...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

भारतीय खेळांच्या चाहत्यांसाठी काल रविवारचा दिवस खास होता. भारताच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळांत देशाचे नाव मोठे केले आहे.

नवी दिल्ली: भारतीय खेळांच्या चाहत्यांसाठी काल रविवारचा दिवस खास होता. भारताच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळांत देशाचे नाव मोठे केले आहे. ऑलिम्पिकमधील पदकासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या कुस्तीपटू विनेश फोगटने युक्रेनमधील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर पुरुष हॉकी संघानेही जर्मनीला मोठ्या फरकाने पराभूत केले.

कोरोनानंतर क्रिकेट या मैदानी खेळाला परत यायाला बराच काळ लोटला आहे, पण आता हळूहळू बाकीचे खेळही पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. ऑलिम्पिकपूर्वी भारतीय खेळाडू स्वत: ला जुन्या फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत. काल रविवारी अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतूक करत ट्विट करुन विजेत्यांचे अभिनंदन केले.

सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करुन अभिनंदन केले

'भारतीय खेळांसाठी खास दिवस. जर्मनीला पराभूत केल्याबद्दल हॉकी संघाचे अभिनंदन आणि युक्रेनच्या कीव येथे झालेल्या आउटस्टँडिंग युक्रेन कुस्ती आणि कोच मेमोरियल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल विनेश फोगाट यांचे अभिनंदन, असे ट्वीट सचिन तेंडुलकरने केले आहे.

विनेश फोगट कोरोनानंतर गोल्ड घेवून परतली

विनेशने युक्रेनियन कुस्ती स्पर्धेत महिला वर्गासाठी 53 किलो वजन गटातील अंतिम सामना जिंकून सुवर्ण जिंकले. विनेशने जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाचा आणि 2017 च्या जागतिक क्रमांकाचा बेलारूसच्या व्हेनेसा कलाडझिंस्कायाचा 10-8 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. 2021 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या चार भारतीय पैलवानांपैकी विनेश ही एक आहे. त्यांच्याशिवाय पुरुष कुस्तीपटू बजरंग पुनिया ( 65 किलो), रवी दहिया (57 किलो) आणि दीपक पुनिया (86 किलो) यांचीही टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.

हॉकी संघही विजयासह परतला

कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतीय हॉकी संघ बऱ्याच दिवसानंतर पुन्हा मैदानात परतला, संपूर्ण संघाच्या बळावर युवा खेळाडू विवेक सागर प्रसादने एका मिनिटाच्या आत दोन गोल करून जर्मनिचा 6-1ने पराभव केला. भारताकडून विवेक (27 व 28 व्या मिनिटाला) व्यतिरिक्त नीलकांत शर्मा (13 व्या मिनिटाला), ललितकुमार उपाध्याय (41 व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (42 व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (47 व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

ISL 2020-21 : प्ले ऑफ मध्ये मुंबई सिटीसमोर एफसी गोवाचे आव्हान 

 

 

संबंधित बातम्या