ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपवरती भारतीय खेळाडूंचा कब्जा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व आहे.

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज हर्षल पटेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे. त्याने या मोसमात आतापर्यंत 09 बळी मिळवले आहेत. दिल्ली कॅपिटलचा अवेश खान आणि मुंबई इंडियन्सचा राहुल चहर यांनी प्रत्येकी आठ गडी बाद केले आहेत. या यादीमध्ये आवेश दुसर्‍या आणि राहुल तिसर्‍या स्थानावर आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सचा ट्रेंट बोल्ट सहा विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे तर राजस्थान रॉयल्सचा चेतन साकरिया सहा विकेटसह पाचव्या स्थानावर आहे. यासह, टॉप पाच गोलंदाजांमध्ये फक्त एक विदेशी खेळाडू आहे. (Indian players occupy Orange Cap and Purple Cap)

कॅप्टन कूल धोनी चिडला; पहा video

आयपीएल 2021 च्या 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (एमआय) सहा गडी राखून  दिल्लीने पराभूत केले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवननेच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. त्याचे नावे आता स्पर्धेत 57.75 च्या सरासरीने 231 धावा आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध 49 चेंडूत 92 धावांची खेळी करत धवनने ऑरेंज कॅप मिळवली होती. तसेच आरसीबीचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने त्याच्याकडून ही कॅप परत घेतली होती. मात्र, मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध 45 डावांची खेळी करून धवनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली.

त्याचबरोबर आता यादीतील दुसरे स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. त्याने 58.67 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) कर्णधार केएल राहुल तिसर्‍या क्रमांकावर आहे. राहुलने 40.25 च्या सरासरीने 161 धावा आहेत. त्याचबरोबर कोलकाता नाइट रायडर्सचा नितीश राणा 155 धावाांसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि सनरायझर्स हैदराबादच्या (एसआरएच) जॉनी बेयरस्टो पाचव्या क्रमांकावर आहे.

AFC Champions 2021: एफसी गोवाचे खेळाडू थकलेत - फेरांडो

दरम्यान, आयपीएलच्या हंगामाला 9 एप्रिलला सुरुवात झाली. आतापर्यंत पंधरा सामने झालेले असून आज सोळावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात होणार आहे. आरसीबीचा संघ गुणतालिकेत 3 सामन्यांमध्ये विजय मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच राजस्थानचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.  

संबंधित बातम्या