वर्ल्ड टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघ जाहीर; निवड समितीकडून मोठे बदल

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

आयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Champoinship) अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवड समितीने चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात 20 खेळाडूंची निवड केली. यात 6 वेगवान गोलंदाज तसेच 3 फिरकी गोलंदाज आहेत. दुखापतीनंतर रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांचे संघात पुनरागमन झाले आहेत, तर हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांना निवड समितीने दुर्लक्ष केले. भारत आणि न्यूझीलंड (India vs Newzealand) यांच्यात 18 जून रोजी प्रथमच कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामना होईल. हा सामना साऊथॅम्प्टनमधील दि एजेस बाउल स्टेडियमवर खेळला जाईल. (Indian squad for World Test series announced; Big changes from the selection committee)

‘आयपीएल’ मधील सट्टेबाजांचा पर्दाफाश

टीम इंडिया (Team India)
फलंदाज: विराट कोहली (कप्तान) (Virat Kohli), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा
विकेटकीपर: रिषभ पंत, लोकेश राहुल आणि रिद्धिमान साहा (राहुल-साहा यांना फिटनेस टेस्ट क्लिअर करावी लागेल)
फिरकी अष्टपैलू: हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर. 
वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव

स्टँडबाय प्लेअरः
बॅट्समन: अभिमन्यु एस्वरन
वेगवान गोलंदाज: प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला

"इरफान पठाणचे आपल्या सुनेसोबत अनैतिक संबंध"; वृद्ध दाम्पत्याचे आरोप

डब्ल्यूटीसी (WTC) फायनल्ससह इंग्लंड दौर्‍यासाठी देखील संघ जाहीर 
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघालाही ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यासह हा संघही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भाग घेईल. या कारणास्तव, बीसीसीआय एक मोठा स्वाड पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून सराव सामना नसतानाही खेळाडू आपापसांत सराव करू शकतील.

बीसीसीआयने (BCCI) डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड दौर्‍याची तयारी केली
निवड समितीने नुकतेच 35 संभाव्य खेळाडूंची नावे बीसीसीआयकडे सादर केली. मंडळाने पथकाच्या यादीनुसार रसद व प्रवासाची व्यवस्थादेखील सुरू केली आहे. चार्टर्ड विमानाने विराटची टीम इंग्लंडला रवाना होईल. 18 जून ते 22 जून दरम्यान डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यानंतर हा संघ इंग्लंडविरुद्ध एक महिना तेथे राहून कसोटी मालिकेचा सराव करेल. 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.

संबंधित बातम्या