इंडियन सुपर लीग: हैदराबाद संघात आणखी एक परदेशी खेळाडू

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

हैदराबाद एफसी संघाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी आणखी एक परदेशी फुटबॉलपटू करारबद्ध केला आहे. स्पेनचा ३० वर्षीय बचावपटू ओदेई ओनैन्दिया संघातील पाचवा विदेशी खेळाडू आहे.

पणजी: हैदराबाद एफसी संघाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी आणखी एक परदेशी फुटबॉलपटू करारबद्ध केला आहे. स्पेनचा ३० वर्षीय बचावपटू ओदेई ओनैन्दिया संघातील पाचवा विदेशी खेळाडू आहे.

बचावफळीत खेळणारा ओदेई यापूर्वी स्पॅनिश सेगुंडा विभागीय संघ सीडी मिरांडेज संघाकडून खेळत होता. हैदराबाद एफसीने त्याच्याशी एका वर्षाचा करार केला आहे. मिरांडेज संघाकडून खेळताना ओदेई याने मागील दोन मोसमात चमकदार खेळ केलेला आहे. या संघाने २०१८-१९ मोसमात सेगुंडा विभागासाठी पात्रता मिळविली, २०१९-२० गुणवतक्यात वरचा क्रमांक मिळविला. त्यांनी कोपा डेल रे स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. 

हैदराबाद एफसीचे स्पॅनिश प्रशिक्षक मानोलो मार्किझ यांच्यानुसार ओदेई याच्या स्पेनमधील अनुभवाचा लाभ आयएसएल स्पर्धेत खेळताना होणार आहे. ओदेई बास्के येथील रहिवासी आहे. व्यावसायिक कारकिर्दीची सुरवात त्याने एथलेटिक बिल्बाओ संघातून केली. नंतर त्याने सीडी बास्कोनियो, सीडी एल्गोईबार, सीएसडी डुरांगो आदी संघांचे प्रतिनिधित्व केले. नंतर २०११ साली त्याने एसडी आमोरेबिएटेन संघातर्फे सेगुंडा ब विभागात पदार्पण केले. नंतर २०१८ साली तो मिरांडेज संघात दाखल झाला. 

संबंधित बातम्या