इंडियन सुपर लीग: चेन्नईयीन संघात बोस्नियन बचावपटू

क्रीडा प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

बोस्निया-हर्झेगोव्हिना देशाचा सेंटर-बॅक खेळाडू एनेस सिपोविच चेन्नईयीन एफसी संघाच्या बचावफळीत दाखल झाला आहे. तो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमात खेळेल.

पणजी : बोस्निया-हर्झेगोव्हिना देशाचा सेंटर-बॅक खेळाडू एनेस सिपोविच चेन्नईयीन एफसी संघाच्या बचावफळीत दाखल झाला आहे. तो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमात खेळेल.

बोस्नियाची राजधानी साराजेव्हो येथील सिपोविच सहा फूट सहा इंच उंचीचा आहे. चेन्नईयीन एफसीशी करार करण्यापूर्वी तो कतारमधील उम्म सलाल स्पोर्टस क्लबकडून खेळला होता. गतआठवड्यात त्याने तिसावा वाढदिवस साजरा केला. आयएसएल स्पर्धेत खेळणारा तो बोन्नियाचा पहिलाच फुटबॉलपटू  ठरेल. 

संबंधित बातम्या