इंडियन सुपर लीग: चेन्नईयीनने करणजित सिंगचा करार वाढविला

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीने गोलरक्षक करणजित सिंग याचा करार आणखी एका मोसमासाठी वाढविला आहे. ३४ वर्षीय गोलरक्षक चेन्नईतील संघात २०२०-२१ मोसमअखेरपर्यंत असेल. 

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीने गोलरक्षक करणजित सिंग याचा करार आणखी एका मोसमासाठी वाढविला आहे. ३४ वर्षीय गोलरक्षक चेन्नईतील संघात २०२०-२१ मोसमअखेरपर्यंत असेल. 

चेन्नईयीन एफसीसमवेत करणजितचा २०२०-२१ हा सलग सहावा मोसम असेल. या कालावधीत चेन्नईयीन एफसीने २०१५ व २०१७-१८ मोसमात आयएसएल स्पर्धा जिंकली. गतमोसमात करणजितने संघाचा गोलरक्षक आणि गोलरक्षक प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी पेलली होती. आगामी मोसमात साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघात गोलरक्षक असेल. नव्या प्रशिक्षकांच्या स्टाफमध्ये गोलरक्षक प्रशिक्षक असेल. 

करणजितने सर्व स्पर्धांत चेन्नईयीनचे ६२ सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. गतमोसमात गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या सामन्यात करणजितने चेन्नईयीनचे नेतृत्वही केले होते.

संबंधित बातम्या