आज वास्कोत एटीके मोहन बागान विरूद्ध ईस्ट बंगाल लढत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम खास ठरला आहे. यंदा प्रथमच एका शहरातील दोन संघ स्पर्धेत खेळत असून एटीके मोहन बागान व ईस्ट बंगाल यांच्यातील कोलकाता डर्बीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम खास ठरला आहे. यंदा प्रथमच एका शहरातील दोन संघ स्पर्धेत खेळत असून एटीके मोहन बागान व ईस्ट बंगाल यांच्यातील कोलकाता डर्बीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. त्यासाठी अशा डर्बींचा अनुभव असलेले इंग्लंडचे रॉबी फावलर सज्ज झाले आहेत.

आयएसएलमधील पहिली कोलकाता डर्बी आज वास्को येथील टिळक मैदानावर होईल. आय-लीगमध्ये कितीतरी वेळा कोलकाता डर्बीची चुरस पाहायला मिळाली आहे, पण आयएसएलमध्ये हा योग प्रथमच येत आहे. शुक्रवारच्या ऐतिहासिक लढतीत अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉल दिएगो मॅराडोना यांच्या निधनाचे सावट असेल, कारण हा माजी विश्वविजेता फुटबॉलपटू कोलकात्यात खूपच लोकप्रिय होता.

इंग्लंडमध्ये अनेक डर्बींचे साक्षीदार असलेले फावलर यंदाच्या मोसमात ईस्ट बंगालचे प्रशिक्षक आहेत. लिव्हरपूर आणि मँचेस्टरमधील अनेक डर्बीत फावलर यांनी भाग घेतला आहे, काही वेळा ते शिल्पकारही ठरले आहेत. आता प्रशिक्षक या नात्याने ते भारतातील ऐतिहासिक डर्बीत पदार्पण करत आहेत.

 दृष्टिक्षेपात..

आयएसएल स्पर्धेत मोहन बागान व ईस्ट बंगाल या कोलकात्यातील संघांचे पदार्पण
आय-लीगमध्ये गतमोसमात मोहन बागान गतमोसमात विजेते, तर ईस्ट बंगाल उपविजेते

अधिक वाचा :

न्यूझीलंडमध्ये क्रिकेट मालिकेसाठी दाखल झालेले पाकिस्तानचे खेळाडू बेशिस्त

कर्णधार विराट कोहलीदेखील रोहितच्या दुखापतीबाबत साशंक

आयएसएलमध्ये फॉर्म परत मिळवण्यासाठी एफसी गोवाचा संघर्ष 

संबंधित बातम्या