Indian Super League: ओडिशा विरोधातील सामना बरोबरीत, एफसी गोवा आता चौथ्या स्थानी

बरोबरीच्या एका गुणामुळे एफसी गोवाचे (+6) आता 17 लढतीतून 27 गुण झाले आहेत.
FC Goa
FC Goa Dainik Gomantak

ओडिशा एफसीला सामन्यातील बाकी 23 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले, तरीही त्यांनी एफसी गोवास 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. या निकालामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात गोव्यातील संघाची किंचित प्रगती झाली, तर भुवनेश्वरमधील संघाला सहाव्या स्थानी येणे शक्य झाले नाही.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सोमवारी सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास नोआ सदावी याच्या शानदार गोलमुळे एफसी गोवाने आघाडी घेतली. मात्र 43व्या मिनिटास गोलक्षेत्राच्या बाहेरून मारलेल्या सणसणीत थेट फ्रीकिकवर दिएगो मॉरिसियो याने यजमान संघाला बरोबरी साधून दिली. यावेळी मॉरिसियोने प्रेक्षणीय फटका मारताना चेंडूला खेळाडूंच्या भिंतीवरून गोलनेटची दिशा दाखविली. एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याने उंच उडी घेतली, पण चेंडू त्याला रोखता आला नाही.

सामन्याच्या 67व्या मिनिटास साहिल पनवार याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले, त्यामुळे ओडिशाला एक खेळाडू कमी घेऊन खेळावे लागले, मात्र त्यांनी एफसी गोवाला लाभ उठवू दिला नाही. ओडिशाचा गोलरक्षक अमरिंदर सिंगही पाहुण्या संघाला भारी ठरला. त्यातच विश्रांतीनंतर लगेच (51वे मिनिट) एफसी गोवाच्या अल्व्हारो वाझकेझ याचा गोल ऑफसाईड ठरला. त्यापूर्वी पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममध्ये वाझकेझ याला संधी थोडक्यात हुकली होती.

FC Goa
CK Nayudu Trophy : आंध्रची स्थिती खूपच मजबूत; गोव्यावर 272 धावांची आघाडी

एफसी गोवा आता चौथ्या स्थानी

बरोबरीच्या एका गुणामुळे एफसी गोवाचे (+6) आता 17 लढतीतून 27 गुण झाले आहेत. एटीके मोहन बागानचेही (+5) तेवढेच गुण आहेत. मात्र सरस गोलसरासरीमुळे कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला चौथा क्रमांक मिळाला.

तिसऱ्या क्रमांकावरील केरळा ब्लास्टर्सपेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे. एफसी गोवाप्रमाणेच ओडिशाचीही ही यंदा स्पर्धेतील तिसरी बरोबरी ठरली. 17 लढतीनंतर त्यांचे 24 गुण झाले. जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सातव्या क्रमांकावर राहिला. सहाव्या स्थानावरील बंगळूरपेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे.

FC Goa
Open Tennis Tournament : गास्पार डायस टेनिस स्पर्धेत ऐश्वर्या जाधवने पटकावला तिहेरी किताब

ओडिशाविरुद्ध एफसी गोवा अपराजित

आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा संघ पुन्हा एकदा ओडिशाविरुद्ध अपराजित राहिला. त्यांच्यात आतापर्यंत आठ लढती झालेल्या आहेत. एफसी गोवाने पाच सामने जिंकले, तर सोमवारची बरोबरी तिसरी ठरली.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाच्या नोआ सदावीचे यंदा स्पर्धेत 7 गोल

- स्पर्धेत 10 गोल नोंदवून ओडिशाचा दिएगो मॉरिसियो संयुक्त अग्रस्थानी

- एफसी गोवा स्पर्धेत ओळीने 4 सामने अपराजित, 2 विजय व 2 बरोबरी

- ओडिशाची सलग 2 लढतीत बरोबरी, 4 लढतीतून 2 गुणांची कमाई

- मोसमात एफसी गोवाच्या अवे मैदानावर 3 बरोबरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com