Indian Super League: फुटबॉलसाठी गोवा सुरक्षित!

देशातील लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा गोव्यात खेळली जाणार आहे.
Indian Super League: फुटबॉलसाठी गोवा सुरक्षित!
फुटबॉल स्पर्धा Dainik Gomantak

यावर्षी नोव्हेंबरपासून इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धा गोव्यातच होणार, हे नक्की झाले आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे (Covid-19) सलग दुसऱ्या वर्षी जैवसुरक्षा वातावरणात ही देशातील लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा (football tournament) गोव्यात (Goa) खेळली जाणार आहे. (Indian Super League football tournament will be held in Goa from November)

कोविड-19 च्या सावटाखाली गतहंगामात स्पर्धेतील 115 सामने सुरळीतपणे झाले. त्यामुळे स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडचा हुरूप वाढला आणि त्यांनी आखातातील देशांऐवजी स्पर्धा घेण्यात पुन्हा एकदा गोव्याला प्राधान्य दिले, याचाच अर्थ गोवा राज्य फुटबॉलसाठी सुरक्षित आहे.

फुटबॉल स्पर्धा
Goa Cricket: नेट शिबिरासाठी शिखा पांडेची उत्सुकता

आयएसएल स्पर्धेमुळे पर्यटन व्यवसायात मंदी आलेल्या हॉटेल व्यवसायात थोडीफार तेजी येईल. एकंदरीत स्पर्धेमुळे गोव्याच्या अर्थकारणासही हातभार लागतो. गतवर्षी सारे सामने रिकाम्या स्टेडियमवर झाले होते. यंदाही तेच चित्र असेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, आयोजक स्टेडियमवर फुटबॉलप्रेमींनी यंदाही प्रवेश देण्याची शक्यता खूपच धूसर आहे. काही का असेना, आयएसएलमुळे देशातील फुटबॉलला कोविड कालखंडातही चालना मिळत आहे.

दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) येथील 21 वर्षीय आक्रमक फुटबॉलपटू अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याच्याशी हैदराबाद एफसीने (Hyderabad FC) तीन वर्षांचा करार केला आहे. इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील मागील दोन मोसम जमशेदपूर एफसीकडून (Jamshedpur FC) खेळल्यानंतर अनिकेत आगामी मोसमात हैदराबादच्या जर्सीत दिसणार आहे.

फुटबॉल स्पर्धा
गोव्यातील फुटबॉलपटूंना रोजगाराची संधी

त्याचबरोबर गोव्यातील फुटबॉल प्लेयरसाठी एक खास बातमी आहे. मुंबईतील आयकर प्रधान मुख्य (Chief of Income Tax) आयुक्तांच्या कार्यालयातर्फे फुटबॉलसह (Football) 22 क्रीडाप्रकारातील गुणवान क्रीडापटूंना नोकरीत (Jobs for athletes) घेतले जाणार आहे. यामध्ये आयकर निरीक्षक (Income tax inspector) (किमान शैक्षणिक पात्रता - पदवी), कर सहाय्यक (पदवी) आणि बहुकार्य कर्मचारी (दहावी) या पदांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com