इंडियन सुपर लीग: चर्चिल ब्रदर्ससाठी नवा प्रशिक्षक निश्चित

क्रीडा प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

गोव्याचा चर्चिल ब्रदर्स संघ आगामी आय-लीग स्पर्धेत नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. या पदासाठी स्पेनमधील ४७ वर्षीय फर्नांडो सांतियागो व्हारेला यांना प्राध्यान मिळाले आहे.

पणजी: गोव्याचा चर्चिल ब्रदर्स संघ आगामी आय-लीग स्पर्धेत नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. या पदासाठी स्पेनमधील ४७ वर्षीय फर्नांडो सांतियागो व्हारेला यांना प्राध्यान मिळाले आहे.

 सांतियागो व्हारेला गतमोसमात (२०१९-२०) गोकुळम केरळा एफसी संघाचे प्रशिक्षक होते.

  गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स संघ पोर्तुगालच्या बर्नार्डो तावारिस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता. संघाच्या कामगिरीत घसरण झाली, त्यामुळे तावारिस यांना डच्चू देण्यात आला होता. गतमोसमात चर्चिल ब्रदर्सने २० गुणांसह आठवा क्रमांक मिळविला होता.

संबंधित बातम्या