Indian Super League : एफसी गोवा संघात नवा ‘विंगर’

Indian Super League : मणिपूरच्या नोंगडोंबा नाओरेम याच्याशी करार
Indian Super League : Nongdomba Naorem
Indian Super League : Nongdomba NaoremDainik Gomantak

पणजीः एफसी गोवा (FC Goa) संघाने इंडियन सुपर लीग (Indian Super League) मोसमासाठी आक्रमणात युवा पायांना प्राधान्य देताना मणिपूरचा (Manipur) 21 वर्षीय नोंगडोंबा नाओरेम (Nongdomba Naorem) याच्याशी एकापेक्षा जास्त वर्षांचा करार केला आहे. वैद्यकीय आणि वैयक्तिक अटींची पूर्तता केल्यानंतर या विंगरने बुधवारी करारपत्रावर सही केली. ‘‘माझ्यासाठी हा फार मोठा दिवस आहे. भारतातील मोठ्या क्लबशी करार केल्यामुळे मी खूप आनंदित आहे. मला वाटतं, की हा क्लब माझ्यासाठी अतिशय योग्य आहे. मी त्यांचा दीर्घकालीन प्रशंसक आहे,’’ असे नोंगडोंबा याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘प्रशिक्षकास माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेत जीवनात नवा अध्याय लिहिण्यासाठी मी प्रेरित आहे,’’ असे नोंगडोंबा याने नमूद केले. एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी नव्या विंगरचे संघात स्वागत केले आहे. ‘‘तो तांत्रिदृष्ट्या खूपच दर्जेदार आहे. आय-लीग स्पर्धेत 2019-20 मध्ये मोहन बागानकडून खेळताना त्याने आमचे लक्ष वेधले. गतवर्षी दुखापतीमुळे त्याचा मोसम खूपच लवकर संपला. आमच्या शैलीच चपखलपणे बसण्याइतपत तो विकसित होईल असे आम्हाला वाटत आहे,’’ असे पुस्कुर यांनी नोंगडोंबा याच्याबद्दल सांगितले.

Indian Super League : Nongdomba Naorem
Indian Super League: एफसी गोवाच्या भात्यात नवे स्पॅनिश अस्त्र

‘विंगर’ नोंगडोंबा नाओरेम याच्याविषयी

- मणिपूरमधील वाबागाई येथे जन्म

- फुटबॉल जडणघडण मिनर्व्हा पंजाब अकादमीत

- 2017 साली भारतात झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेसाठी यजमान संघात

- 2019-20 मोसमात आय-लीग विजेत्या मोहन बागान संघात, तेव्हा 16 लढतीत 2 गोल, 5 असिस्ट

- आय-लीग स्पर्धेत इंडियन ॲरोजतर्फे पदार्पण

- आयएसएल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सचे प्रतिनिधित्व

- 2020-21 मोसमात दुखापतग्रस्त होण्यापूर्वी 3 आयएसएल सामने

Indian Super League : Nongdomba Naorem
Indian Super League: एफसी गोवाचा मोसमपूर्व सराव सुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com