इंडियन सुपर लीग: आणखी एका मोसमासाठी स्पेनमधील बचावपटू टिरी भारतात

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

स्पेनमधील बचावपटू टिरी (जोस लुईस एस्पिनिसो अर्रोयो) भारतात आणखी एक मोसम खेळणार आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तो २०२०-२१ मध्ये सहावा मोसम खेळेल.

पणजी:  स्पेनमधील बचावपटू टिरी (जोस लुईस एस्पिनिसो अर्रोयो) भारतात आणखी एक मोसम खेळणार आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तो २०२०-२१ मध्ये सहावा मोसम खेळेल.

टिरी याला आगामी मोसमासाठी एटीके मोहन बागान एफसीने करारबद्ध केले आहे. या २९ वर्षीय बचावपटूने २०१५ व २०१६ मोसमात एटीकेचे प्रतिनिधित्व केले होते, नंतरचे तीन मोसम जमशेदपूर एफसीकडून खेळला होता. तो संघात असताना एटीके संघाने २०१६ मोसमात आयएसएल स्पर्धा जिंकली होती. 

स्पेनमधील लॉस बार्रियोस येथील टेरी याने युवा कारकीर्द कादिझ सीएफ संघातर्फे सुरू केली. नंतर एटलेटिको माद्रिदच्या ब संघातून खेळला. त्यानंतर त्याने भारतात खेळण्याचे ठरविले. आयएसएलमधील दोन मोसमात तो एटीके संघाकडून २४ सामने खेळला, नंतरच्या तीन मोसमात त्याने जमशेदपूरचे ४८ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. या कालावधीत त्याने ६०६ क्लिअरन्स, १५७ टॅकल्स, ११७ इंटरसेप्शन्स आणि ७६ ब्लॉक्सची नोंद केली आहे.

संबंधित बातम्या