भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राची फेडरेशन विरोधात उच्च न्यायालयात धाव

आशियाई चॅम्पियनशिप (Asian Championships) 28 सप्टेंबरपासून दोहा येथे सुरू होत आहे. जागतिक क्रमवारीत 56 व्या क्रमांकावर असणाऱ्या सुतीर्थ मुखर्जी (Sutirtha Mukherjee) ही 97 व्या क्रमांकावर असलेल्या बत्राच्या (Manika Batra) जागी महिला संघाचे नेतृत्व करेल.
भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) पुन्हा एकदा टेबल टेनिस  (Table tennis) फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) विरुद्ध उभी राहिली आहे.
भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) पुन्हा एकदा टेबल टेनिस (Table tennis) फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) विरुद्ध उभी राहिली आहे. Dainik Gomantak

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) पुन्हा एकदा टेबल टेनिस (Table tennis) फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) विरुद्ध उभी राहिली आहे. आशियाई चॅम्पियनशिपच्या (Asian Championships) विरोधात बाहेर पडल्यानंतर तीने दिल्ली उच्च न्यायालयात महासंघाविरुद्ध अपील केले होते. मनिका बत्राच्या याचिकेवर केंद्र सरकारच्या (Central Government) वकिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) उत्तर देण्यास सांगितले आहे.

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) पुन्हा एकदा टेबल टेनिस  (Table tennis) फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) विरुद्ध उभी राहिली आहे.
Tokyo Olympics: पहिल्याच ऑलंपिकमध्ये लव्हलिनाने मारला पदकाचा पंच

टोकियो ऑलिम्पिकपासून मनिका बत्रा आणि टेबल टेनिस फेडरेशनमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. मनिकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत तिसरी फेरी गाठून इतिहास रचला. असे करणारी ती पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू होती. मनिकाने गेल्या काही वर्षांत देशासाठी चांगली कामगिरी केली आहे, पण तीचे फेडरेशनसोबत खराब संबंध राहिले आहेत.

मनिकाने राष्ट्रीय शिबिरात भाग घेतला नाही

महासंघाने अलीकडेच आशियाई चॅम्पियनशिपसाठी संघाची घोषणा केली होती. या संघात मनिका बत्राचे नाव नव्हते. मनिका बत्रा या निर्णयामुळे खूप रागावली आणि या कारणास्तव तिने फेडरेशनच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेत याचिका दाखल केली. त्याचवेळी, फेडरेशनचे म्हणणे आहे की, मनिकाने सोनीपत येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरात भाग घेतला नाही, त्यामुळेच तिला संघात स्थान मिळाले नाही. महासंघाच्या म्हणण्यानुसार, तीने आधीच स्पष्ट केले होते की सर्व खेळाडूंना शिबिरात सहभागी होणे अनिवार्य आहे. आशियाई चॅम्पियनशिप 28 सप्टेंबरपासून दोहा येथे सुरू होत आहे. जागतिक क्रमवारीत 56 व्या क्रमांकावर असणाऱ्या सुतीर्थ मुखर्जी ही 97 व्या क्रमांकावर असलेल्या बत्राच्या जागी महिला संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर पुरुष संघाचे नेतृत्व मानव ठक्कर करणार आहेत.

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) पुन्हा एकदा टेबल टेनिस  (Table tennis) फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) विरुद्ध उभी राहिली आहे.
गोवा टेबल टेनिस संघटनेचे सचिव सुरेश भांगी यांचे निधन

टोकियो ऑलिम्पिकनंतर झाला वाद सुरू

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनिका राष्ट्रीय प्रशिक्षकाशिवाय खेळण्यासाठी आली होती. यानंतर टीटीएफआयने तीला कारणे दाखवा नोटीस बजावली. मनिकाने उत्तर देताना, रॉयची मदत घेण्यास नकार देऊन तिने खेळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा तीव्र शब्दात इन्कार केला. मनिकाने आरोप केला की रॉयने तिला मार्चमध्ये ऑलिम्पिक पात्रता दरम्यान एक सामना गमावण्यास सांगितले होते. म्हणूनच तिने टोकियो ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धेत रॉयची मदत घेण्यास नकार दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com