भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यादरम्यान  षटकांची गती न राखल्यामुळे भारतीय संघाला दंड

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यादरम्यान  नियोजित वेळेपेक्षा फारच अधिक काळ ५० षटके पूर्ण करण्यासाठी घेतल्यामुळे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारतीय संघावर दंडाची कारवाई केली.

सिडनी : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यादरम्यान  नियोजित वेळेपेक्षा फारच अधिक काळ ५० षटके पूर्ण करण्यासाठी घेतल्यामुळे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारतीय संघावर दंडाची कारवाई केली. प्रत्येक खेळाडूच्या सामना मानधनातील २० टक्के रक्कम कापण्यात आली.

दरम्यान, सामनावीर ठरलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने भारतीयांच्या ‘टाईमपास’वर अप्रत्यक्षपणे टीका केली. आपण खेळलेला हा सर्वात प्रदीर्घ एकदिवसीय सामना होता, असे मत स्टीव स्मिथने सामन्यानंतर मत व्यक्त केले. स्मिथने या सामन्यात शतकी खेळी केली.

 

अधिक वाचा :

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला ३९० धावांचे आव्हान

मायकेल वॉन म्हणतोय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिन्ही मालिका हरणार.. 

एफसी गोवाच्या रेडीमला कारणे दाखवा नोटीस

संबंधित बातम्या