INDvsENG 1st ODI : टीम इंडियाचा पाहुण्या इंग्लंड संघावर दमदार विजय 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 मार्च 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा 66 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा 66 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील पहिला सामना आज पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 318 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघाला दिले होते. आणि इंग्लंडचा संघ 42.1 षटकात सर्व गडी गमावत 251 धावाच करू शकला. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात पाच गडी गमावत 317 धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा शिखर धवनने केल्या. त्याने १०६ चेंडूचा सामना करताना 11 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार यांच्या जोरावर 98 धावा केल्या. मात्र शतकासाठी फक्त 2 धावा कमी असताना त्याला बेन स्टोक्सने कर्णधार मॉर्गन करवी झेलबाद केले. आजच्या सामन्यात भारताची सुरवात चांगली झाल्याचे पाहायला मिळाले. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर रोहित शर्माला 28 धावांवर बेन स्टोक्सने जोस बटलर करवी झेलबाद केले.

Ind vs Eng:  एकीकडे पांड्य़ा ब्रदर्स तर दुसरीकडे करन ब्रदर्स

यानंतर, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 105 धावांची भागीदारी रचली. विराट कोहलीने अर्धशतक झळकावल्यानंतर 56 धावांवर असताना मार्क वुडने त्याला झेलबाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यरला देखील मार्क वुडने लगेचच माघारी धाडले. तो अवघ्या सहा धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यर नंतर मागील काही दिवसांपासून फॉर्मच्या शोधात असलेल्या केएल राहुलने आज चमकदार कामगिरी केली. त्याने 43 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याच्या स्वरूपात भारतीय संघाला पाचवा झटका बसला. हार्दिक पांड्याला बेन स्टोक्सने फक्त एक धावांवर बाद केले. हार्दिक पांड्या नंतर त्याचा भाऊ कृणाल पांड्या आज आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. आणि या पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावून नवीन इतिहास रचला. त्याने 31 चेंडूचा सामना करताना, 7 चौकार आणि 2 षटकार खेचले. आणि नाबाद 58 धावा केल्या.

भारतीय संघाने दिलेल्या 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरवात दमदार झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड संघाचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 135 धावांची भागीदारी रचली. ही जोडी आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने जेसन रॉयला 46 धावांवर असताना बाद केले. व त्यानंतर मैदानात आलेल्या बेन स्टोक्सला देखील प्रसिद्ध कृष्णाने अवघ्या एक धावांवर माघारी धाडत इंग्लंड संघाला दुसरा धक्का दिला. बेन स्टोक्स प्रसिद्ध कृष्णाने झेलबाद केले. यानंतर सलामीवीर जॉनी बेअरस्टोला शार्दूल ठाकूरने कुलदीप यादव करवी झेलबाद केले.

जॉनी बेअरस्टो 94 धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टोनंतर कर्णधार इयॉन मॉर्गनला देखील शार्दूल ठाकूरने बाहेरचा रस्ता दाखवला. इयॉन मॉर्गनने 22 धावा केल्या. त्यानंतर जोस बटलरला (2) शार्दूल ठाकूरने पायचीत केले. तर सॅम बिलिंग्सला (18) प्रसिद्ध कृष्णाने विराट कोहली करवी झेलबाद केले. सॅम बिलिंग्सनंतर मोईन अलीने मैदानात टिकण्याचा प्रयत्न केला. परंतु 30 धावांवर असताना भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. मोईन अली परतल्यावर इंग्लंड संघाचे उर्वरित फलंदाज लागोपाठ बाद झाले. यावेळेस भारताकडून सर्वाधिक बळी प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या. त्याने चार विकेट्स मिळवल्या. शार्दूल ठाकूरने तीन, भुवनेश्वर कुमारने दोन आणि कृणाल पांड्याने एक विकेट्स मिळवल्या.

संबंधित बातम्या