Sania Mirza-Shoeb Malik Divorce: 'या' मॉडेलमुळे सानिया-शोएबमध्ये आला दुरावा?

सानिया दुबईत तर शोएब पाकिस्ताना राहत असल्याचा दावा
Sania Mirza-Shoeb Malik Divorce
Sania Mirza-Shoeb Malik DivorceDainik Gomantak

Sania Mirza-Shoeb Malik Divorce: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचा दावा शोएबच्या जवळच्या मित्राने केला आहे. शोएबचा हा मित्र त्याच्या मॅनेजमेंट टीमचा भाग आहे. या दोघांनी घटस्फोट घेतल्याचे मी सांगू शकतो, यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही, असे या मित्राने म्हटले आहे.

Sania Mirza-Shoeb Malik Divorce
T20 World Cup: विराट कोहलीने केला वर्ल्ड रेकॉर्ड!

दरम्यान, या घटस्फोटाच्या चर्चेनंतर एका पाकिस्तानी मॉडेलमुळे सानिया आणि शोएब यांच्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. मॉडेल आयेशा कमर हिच्याशी रिलेशनशिपवरून शोएब मलिकची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. यात शोएब म्हणतो की, आयेशाने एका फोटोशुटवेळी माझी खूप मदत केली होती. 2021 मध्ये शोएब आणि आयेशा यांच्यात एक बोल्ड फोटोशूट झाले होते. ते सर्व फोटोज आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

आयेशा ही एक अभिनेत्री आणि युट्युबर आहे. ती पाकिस्तानातील सर्वाधिक मोबदला घेणारी अभिनेत्री आहे. शोएब आणि आयेशा यांनी अनेक मासिकांसाठी फोटोशूट केले आहे. ओके पाकिस्तान नावाच्या मासिकासाठी दोघांनी बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोजवरून तुमच्या पत्नीची काय प्रतिक्रीया होती, असा प्रश्न जेव्हा शोएबला विचारला गेला होता तेव्हा त्याने सानिया काहीही प्रतिक्रिया दिलेली नहाी, असे म्हटले होते.

Sania Mirza-Shoeb Malik Divorce
Shoaib Malik: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने LIVE शोमध्ये केला डान्स; Video

सानिया-शोएब यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, दोघांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. केवळ काही औपचारिकता बाकी आहे. दोघेही आता स्वतंत्र राहतात. सानिया दुबईत आहे तर मलिक पाकिस्तानात आहे. सानियाने तिच्या अलीकडच्या सोशल मीडिया पोस्टमधुनही त्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, सानिया ही शोएबची दुसरी पत्नी आहे. दोघांनी हैदराबाद मध्ये 12 एप्रिल 2010 रोजी लग्न केले होते. दोघांना इजहान नावाचा एक मुलगा आहे, त्याचा जन्म 2018 मध्ये झालेला आहे. शोएबच्या पहिल्या पत्नीचे नाव आयशा सिद्दीकी असे आहे. त्यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. तिला तलाक न देताच शोएबने सानियाशी लग्न केले होते. त्यापुर्वी शोएब-सानिया पाच महिने एकमेकांना डेट करत होते. सानियाने तिच्या ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ मध्ये याबाबत लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com