Indian Women Cricket: गोव्याच्या शिखाची क्रिकेट कारकीर्द लांबणार

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 मे 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मानधन श्रेणीत कायम राखल्यामुळे गोव्याची(Goa) एकमेव महिला कसोटी क्रिकेटपटू शिखा पांडे(Shikha Pandey) हिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लांबणार हे स्पष्ट झाले

पणजी : भारतीय महिला क्रिकेट(Indian Women cricket team) संघातील पुनरागमन, तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मानधन श्रेणीत कायम राखल्यामुळे गोव्याची(Goa) एकमेव महिला कसोटी क्रिकेटपटू शिखा पांडे(Shikha Pandey) हिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लांबणार हे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयने नुकतीच करारबद्ध महिला क्रिकेटपटूंची मानधन श्रेणी जाहीर केली आहे. त्यात शिखाला ब श्रेणीत कायम राखले आहे. अ श्रेणीत तिघी जणी, ब श्रेणीत दहा, तर क श्रेणीत सहा जणी आहेत. हा करार ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंतचा आहे.(Indian Women Cricket Goa women cricketer Shikha Pandey international career to be extended )

कसोटी सामने कमी करण्याबाबत अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही विनंती नाही : ईसीबीचे स्पष्टीकरण 

पुढील महिन्यातील इंग्लंड दौऱ्यासाठी शिखाची कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात निवड झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जाईल.

मुलींची विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार 

यावर्षी मार्च महिन्यात मायदेशी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अनुभवी शिखाला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. 32वर्षीय शिखाने वेगवान गोलंदाजीत 2014 पासून कसोटी, वन-डे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 113 विकेट मिळविल्या आहेत.

संबंधित बातम्या