टीम इंडियाच्या खेळाडूने जिंकला आयसीसीचा Player Of The Month पुरस्कार

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्काराची घोषणा केली. आयसीसी प्रत्येक माहिन्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करण्याऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्काराची घोषणा केली. आयसीसी प्रत्येक माहिन्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करण्याऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देणार आहे. यामुळे महिन्याभरातील पुरुषांच्या आणि महिलांच्या क्रिकेट मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूची या पुरस्कारासाठी निवड होणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच या पुरस्कारांची घोषणा आयसीसीने केली असून, यात भारतीय संघाचा विकेटकिपर फलंदाज रिषभ पंतने बाजी मारली आहे. 

INDvsENG : सुपरकूल चेतेश्वर पुजारादेखील विकेट गमावल्याने झाला नाराज

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना रिषभ पंतने दोन कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर त्याला नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार आयसीसीने जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियासोबत सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने 97 धावांची खेळी केली होती. तर चौथ्या आणि शेवटच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात त्याने नाबाद 89 धावा केल्या होत्या. रिषभ पंतने केलेल्या त्याच्या या खेळीमुळेच टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत कांगारूंना धूळ चारली होती. त्यानंतर, जानेवारी महिन्यात तीन एकदिवसीय आणि दोन टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माइलला आयसीसने महिला प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडले आहे. 

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत शबनिम इस्माइलने धारदार गोलंदाजी करताना सात विकेट्स मिळवल्या होत्या. याशिवाय टी-ट्वेन्टी मालिकेत तिने 5 बळी मिळवले होते. त्यामुळे आयसीसीने जानेवारीच्या प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी शबनिम इस्माइलची निवड केली आहे. कोरोनाच्या काळानंतर पुन्हा क्रिकेट सुरु झाल्यावर जानेवारी महिन्यात रोमांचक क्रिकेट झाल्याचे पाहायला मिळाले होते. व त्यासाठी आयसीसीने रिषभ पंत, जो रूट आणि पॉल स्टर्लिंग यांची पुरस्कारासाठी नामांकन केले होते. आणि मतदानानंतर रिषभ पंतला हा पुरस्कार जाहीर केला आहे. 

दरम्यान, प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाल्यानंतर रिषभ पंतने आपल्याला आनंद झाला असल्याचे सांगितले. तसेच, कोणत्याही खेळाडूसाठी, संघाच्या विजयात योगदान देणे हे अंतिम पारितोषिक असते, परंतु अशा उपक्रमामुळे तरुणांना स्वत: ला सुधारण्यास अधिक वाव मिळणार असल्याची भावना रिषभ पंतने यावेळेस व्यक्त केली. शिवाय आपल्याला मतदान करणाऱ्या आणि सगळ्या चाहत्यांचे रिषभ पंतने आभार मानले आहेत.                

संबंधित बातम्या