आशियाई स्पर्धेत भारताच्या शिवा थापाची उपांत्यपूर्व फेरीत धडक, हुस्सामुद्दिनचीही आगेकूच

दैनिक गोमंतक
मंगळवार, 25 मे 2021

मोहंमदने कझाकिस्तानच्या (Kazakhstan)  मखमुद साबिरखान याचा 5-0 असा पराभव करत भारतासाठी पहिला विजय मिळवला. त्यानंतर शिवा थापानेही 64 किलो वजनी गटात किर्गिझस्तानच्या दमित्री पुशीनला 5-0 असा पंच देत विजय संपादित केला.

दुबई : आशियाई (Asiai) स्पर्धेत भारताच्या शिवा थापाने (Shiva Thapa) 64 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर 56 किलो वजनीगटात मोहंमद हुस्सामुद्दिन याने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. मोहंमदने कझाकिस्तानच्या (Kazakhstan)  मखमुद साबिरखान याचा 5-0 असा पराभव करत भारतासाठी पहिला विजय मिळवला. त्यानंतर शिवा थापानेही 64 किलो वजनी गटात किर्गिझस्तानच्या दमित्री पुशीनला 5-0 असा पंच देत विजय संपादित केला.

मोहंमद हुस्सामुद्दिनची आता खरी कसोटी लागणार आहे. पुढे त्याची सामना सध्याचा जागतिक आणि अशियाई विजेता मिराझीबेक मिर्झाहालिलोव याच्याशी होणार आहे. हुस्सामुद्दिनला पहिल्या फेरीत 19 वर्षीय मखमुद याने चांगला प्रतिकार करत आक्रमक खेळ केला. परंतु त्याच्या पंचे उत्तम बचाव हुस्सामुद्दिने करत मखमुदवर प्रतिहल्लाचढवत सामना जिंकला. पण दुसरीकडे शिवाला मात्र विजयासठी फार झगडावे लागले नाही. शिवाचे आक्रमण पुशीन भेदू शकला नाही. तिसऱ्या फेरीतच त्याने सामन्यावर वर्चस्व मिळवत विजय निश्चित केला.

ऑलिंपिक पात्र खेळाडूंचे झाले लसीकरण

भारताचा आणखीन एक बॉक्सर सुमीत संगवान याला (81 किलो ) वजनीगटात पराभावाला सामोरे जावे लागले आहे. स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ऑलिंम्पिक पात्र सिमरनजित कौर (60 किलो), साक्षी (54 किलो), जस्मिन (57 किलो), संजित (97 किलो) हे आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

 

संबंधित बातम्या