India vs Australia ऑस्ट्रेलियाचे शेपूट रोखत टिम इंडियाचा ऐतिहासिक विजय ; 8 विकेट्स राखत ऑस्ट्रेलियाला नमवलं

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

टिम इंडियाने ऑस्ट्रेलियाचे शेपूट रोखत दुसरा कसोटी सामना खिशात घातला. पहिल्या कसोटीत झालल्या ऐतिहासीक पराभवामुळे या विजयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजिंंक्य रहाणेने कर्णधाकपदाला साजेशी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. 

मेलबर्न :  काल केलेल्या प्रभावशाली खेळीमुळे आज टिम इंडियाने ऑस्ट्रेलियाचे शेपूट रोखत दुसरा कसोटी सामना खिशात घातला. पहिल्या कसोटीत झालल्या ऐतिहासीक पराभवामुळे या विजयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजिंंक्य रहाणेने कर्णधाकपदाला साजेशी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. 
कालच्या दिवसात एक गोलंदाज कमी असूनही चौघा भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज बाद झाले होते. त्यांच्याकडे दोन धावांची आघाडी होती. आज टिम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखले. टिम इंडियाला आज विजयासाठी ७० धावांची गरज होती. अजिंक्य रहाणे ४० चेंडून २४ धावा करून तर, शुभमन गिल ३६ चेंडूत ३५ धावा करून नाबाद राहिले. 

कालच्या खेळात शतकवीर अजिंक्‍य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांनी १२१ धावांच्या भागीदारीनंतर भारताने पाच फलंदाज ३२ धावांत गमावले, तरीही ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची आघाडी घेतली आणि उमेश यादव तीन षटकांनंतर जखमी झालेला असतानाही भारताच्या चार गोलंदाजांनी मिळून ऑस्ट्रेलियाची ६ बाद १३३ अशी अवस्था केली होती.

 

गोलंदाजांची पुन्हा कमाल

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत वेसण घालणाऱ्या भारतीयांची गोलंदाजी आजही अचूक होती. उमेश यादवने ज्यो बर्न्सला बाद केल्यावर त्याच्या पोटरीचा स्नायू दुखावला. त्यामुळे स्वतःचे चौथे षटक अर्धवट सोडून त्याने परतावे लागले. त्यामुळे कर्णधार रहाणेकडे बुमरा-सिराज-अश्‍विन-जडेजा असे चारच गोलंदाज होते; पण त्यांचा खुबीने वापर केला.

रहाणेचा त्याग
काल सकाळी खेळ सुरू झाल्यावर शतकवीर रहाणे आणि जडेजा यांच्यावर आघाडी वाढवण्याची जबाबदारी होती. जडेजाला अर्धशतकासाठी हवी असलेली एक धाव मिळत नव्हती. अखेर एक संधी दिसू लागल्यावर रहाणेने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो धावचीत झाला. त्यानंतर काही वेळात जडेजाने अर्धशतक पूर्ण केले.

५७ धावांत पाच विकेट

लाबूशेन आणि मॅथ्यू वेड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु पुन्हा एकदा अश्‍विन रहाणेच्या मदतीला धावला. त्याने लाबूशेनला रहाणेमार्फतच बाद केले. त्यानंतर पुढच्या ५७ धावांत ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज बाद झाले. यात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार मिळवणाऱ्या स्टीव स्मिथचाही समावेश होता. बुमराचा एक चेंडू त्याच्या लेग यष्टीवरील बेल हलकीच उडवणारा ठरला. स्मिथलाही आपली बेल कधी उडाली, हे कळले नाही. जडेजानेही आपली अष्टपैलू ताकद दाखवाना अगोदर मॅथ्यू हेड आणि टिम पेन यांना बाद केले. 

संबंधित बातम्या