I-League: फुटबॉल स्पर्धेतून यंदा बढती रद्द होण्याचे संकेत

दैनिक गोमंतक
सोमवार, 17 मे 2021

आय-लीगमधून पदावनती 2021-22 मोसमासाठी रद्द करण्याची शिफारस कार्यकारी समितीस करण्यात आली आहे.

पणजी: कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर आय-लीग फुटबॉल (I League Football Tournament) स्पर्धेतून यंदा पदावनती रद्द होण्याचे संकेत आहे, त्या अनुषंगाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या लीग कमिटीने शिफारस केली आहे. एआयएफएफच्या लीग कमिटीची शिफारस मंजूर झाल्यास मणिपूरच्या नेरोका एफसी संघाचे 2021-22 मोसमातील आय-लीग स्पर्धेतील स्थान अबाधित राहील. जगभरातील 23 देशांच्या फुटबॉल लीगमधून महामारीच्या कारणास्तव पदावनती रद्द करण्यात आली आहे, जेणेकरून सध्याच्या कठीण परिस्थितीत संघांना मदत व्हावी हा हेतू आहे. भारतातील आय-लीगमध्येही असाच निर्णय व्हावा असे लीग कमिचीने सुचविले आहे. यासंदर्भात एआयएफएफचे तांत्रिक संचालक दोरू आयजेक यांनी सादरीकरण केले. त्यास आय-लीग क्लबनीही सहमती दर्शविली असल्याचे एआयएफए लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनंदो धर यांनी नमूद केले आहे.(Indications that the promotion from the football tournament will be canceled this year)

IPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले
 
आय-लीगमधून पदावनती 2021-22 मोसमासाठी रद्द करण्याची शिफारस कार्यकारी समितीस करण्यात आली आहे. त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नेरोका एफसीचे आय-लीगमधील स्थान कायम राहील. 2020-21 मोसमातील आय-लीग स्पर्धेत नेरोका एफसीला 11 संघांत तळाचे स्थान मिळाले, त्यामुळे त्यांच्यावर पदावनतीची टांगती तलवार आली. त्यांनी 14 लढतीत फक्त आठ गुण नोंदविले. आय-लीगमध्ये खेळताना नेरोका एफसीला व्यावसायिक क्लब परवाना निकष पूर्ण करावे लागतील.दरम्यान, एआयएफएफच्या इंडियन वूमन्स लीग, फुटसाल क्लब स्पर्धा आणि आय-लीग पात्रता स्पर्धेविषयी येत्या जून महिन्यात निर्णय घेतला जाईल. देशातील कोविड-19 (COVID-19) परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या स्पर्धांचे भवितव्य ठरेल.

IND vs SL: मोठा धोका; भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द होऊ शकतो?

गोव्यातील निर्णयाकडे लक्ष
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर आय-लीग स्पर्धेतून पदावनती नियम रद्द केल्यास, त्या धर्तीवर गोव्यातही अंमलबजावणी होईल का याची उत्सुकता आहे. गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (GFA) 2020-21 मोसमातील प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सेझा फुटबॉल अकादमीस तळाचे बारावे स्थान मिळाले. स्पर्धेच्या नियमानुसार सेझा अकादमीची पदावनती झाली आहे. राष्ट्रीय महासंघाच्या निर्णयानुसार जीएफएनेही नियमात शिथिलता आणल्यास गोव्यात सेझा अकादमीस आणखी एका मोसमासाठी प्रोफेशनल लीग स्पर्धेत खेळता येईल. कोविड-19 महामारीमुळे जीएफएला 2019-20 मोसमाप्रमाणे 2020-21 मोसमातही प्रथम विभागीय स्पर्धा घेता आलेली नाही. नियमानुसार प्रथम विभागीय विजेता संघ प्रोफेशनल लीगमधील पदावनती झालेल्या संघाची जागा घेतो. गतमोसमात कोअर ऑफ सिग्नल्स संघाने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे यूथ क्लब मनोरा या प्रथम विभागीय संघास प्रोफेशनल लीग स्पर्धेत जागा मिळाली होती.

 

संबंधित बातम्या