INDvsENG: क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर; दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. 

चेन्नई: गेल्या एका वर्षभरानंतर भारतीय क्रिकेट संघ घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. 5 फेब्रुवारीपासून भारताविरूद्ध इंग्लंड संघ कसोटी मालिका खेळणार आहे. 4 सामन्यांची कसोटी मालिका भारत-इंग्लंड दरम्यान रंगणार आहे. या मालीकेतील पहिले दोन सामने चेन्नईला आणि दुसरे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. 

पहिले दोन सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. केंद्र सरकारने क्रीडा स्थळांवर पन्नास टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना उपस्थित राहण्यासंबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टीएनसीए आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमधील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने क्रीडा स्थळांवर गर्दी करण्यास परवानगी देणाऱ्या कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांनंतर दुसर्‍या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याच्या विषयावर चर्चा केली, बीसीसीआय आणि टीएनसीएने दुसर्‍या कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळून परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) विनंती केली होती की खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बंद दाराच्या मागे सामने खेळले जावेत. एमए चिदंबरम स्टेडियमची क्षमता 50,000 आहे. दरम्यान, बीसीसीआयने अहमदाबाद येथे होणार्‍या तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची योजना सुरू केली जात आहे.

स्टेडियमवरील प्रेस बॉक्समधून दोन्ही कसोटी सामन्यांना माध्यमांना सामना कव्हर करण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती  तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. मालिकेचा पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. अहमदाबादमध्ये मोटेरा स्टेडियमवर होणारा हा सामना पहाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण आता त्याचबरोबर चेन्नईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षकांना हजेरी लावता येणार आहे.

“करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेल्या नव्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून मैदानी खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच निर्णयाचा आधार घेत आम्ही हा निर्णय घेतला आहे. करोनासंदर्भात असलेला धोका लक्षात घेवून आम्ही सुरूवातीला 50 टक्केच प्रेक्षकांना परवानगी हा सामना बघण्याची परवाणगी देत आहोत. राज्य सरकारने रविवारी लॉकडाउनचे नियम शिथिल करत क्रिकेट प्रेक्षकांसाठी परवानगी दिली आहे. पण पहिल्या कसोटी मालीकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी द्यायची असेल तर या सगळ्या तयारीसाठी आमच्याकडे पुरेसा वेळ शिल्लक नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी 50 टक्के क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये हा सामना बघता येईल असा निर्णय आम्ही घेतला आहे”, असे संबधित क्रिकेट संघटनेच्या उच्चपदस्थ  अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ISL :एफसी गोवाचा लेनीस निरोप -

संबंधित बातम्या