INDvsAUS पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 166 धावा..रिषभ पंतकडून दोन मोठ्या चुका

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सावध सुरूवात केली. पावसाचा व्यत्यय गेल्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 166 धावा झाल्या आहेत.

सिडनी :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सावध सुरूवात केली. पावसाचा व्यत्यय गेल्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 166 धावा झाल्या आहेत. पाऊस आल्याने आज तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 55 षटकांचाच खेळ होऊ शकला. भराताकडून मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून दिवसाअखेर मार्नस लाबुशेन 67 धावांवर नाबाद आहे. तर विल पुकोव्हस्कीने 62 धावांची खेळी केली. 

त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा करण्याचा निर्णय. तो सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दरम्यान, 22 व्या ओव्हरमध्ये रिषभ पंतने अश्विनच्या गोलंदाजीवर त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्कीला 2 वेळा जीवनदान दिले. पुकोव्हस्कीच्या दोनदा कॅच सोडल्याने अश्विन रिषभ पंतवर रागावलेला दिसून आला.

 

अधिक वाचा :

एफसी गोवाविरुद्ध एक खेळाडू कमी होऊनही `टेन मेन` ईस्ट बंगालची गोलबरोबरी

संबंधित बातम्या