INDvsAUS : बीसीसीआयकडून टीम इंडियाला शाब्बासकी, पाच कोटी रुपयांचा बोनस जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

बीसीसीआयने टीम इंडीयाला पाच कोटी रुपयाचे बोनस जाहीर केले आहे. टीम इंडिया क्रिकेटसाठी हा विशेष क्षण आहे, कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन असं म्हणत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्वीट केले आहे.

ब्रिस्बेन :  गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया विरूध्द टीम इंडियाने बाजी मारताच, बीसीसीआयने टीम इंडीयाला पाच कोटी रुपयाचे बोनस जाहीर केले आहे. 

रिषभ पंत यांनी शेवटच्या क्षणी सुरेख खेळी करत 18 चेंडू राखून भारताला सामना जिंकून दिला. भारताने 3 गडी राखत हा सामना जिंकला. रिषभ पंतने शेवटच्या सत्रात केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाणारा चौथा कसोटी सामना जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. 

बीसीसीआयने टीम इंडियाला पाच कोटी रुपयाचे बोनस जाहीर केले आहे. टीम इंडिया क्रिकेटसाठी हा विशेष क्षण आहे, कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन असं म्हणत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्वीट केले आहे.

 गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया एकदाही पराभूत झालेला नव्हता. भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ही किमया करून दाखवली.

रिषभ पंत 89 तर नवदिप सैनी 0 धावा करून नाबाद राहिले. आज चांगला खेळ केलेल्या शुभमन गीलला शतकाने हुलकावणी दिली. त्याला 146 चेंडूत 91 धावा करता आल्या. त्याच्यानंतर आलेला कर्णधार अजिंक्य रहाणे 24 धावा करत स्वस्तात परतला.  आजच्या पाचव्या दिवसाच्या खेळासाठी भारताकडून मैदानात उतरलेल्या शुभमन गीलने चांगली खेळी करत अर्धशतक झळकावलं.

संबंधित बातम्या