INDvsAUS : बुमराह बरा झाल्यास चौथ्या कसोटीत खेळणार; टीम इंडियाच्या आशा पल्लवित

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैद्यकीय पथक बरोबर काम करत आहेत आणि त्यांचा हा संदेश आहे की, तो ठीक होऊन पून्हा खेळायला येणार की नाही हे शुक्रवारी सकाळी सांगितले जाईल.

ब्रिस्बेन:  भारतीय संघाला गाबा येथे होणाऱ्या मालिकेच्या निर्णायक स्पर्धेत जाण्यासाठी मोठी कामगिरी बजावताना फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठौर म्हणाले की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैद्यकीय पथक बरोबर काम करत आहेत आणि त्यांचा हा संदेश आहे की, तो ठीक होऊन पून्हा खेळायला येणार की नाही हे शुक्रवारी सकाळी सांगितले जाईल.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेन इथं खेळवला जाणार आहे. रवींद्र जडेजा, अश्विन आणि हनुमा विहिरी हे महत्वाचे शिलेदार दुखापतग्रस्त आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह,रिषभ पंत हेदेखील दुखापतग्रस्त झाला आहेत. उमेश यादव आधीच दुखापत झाल्याने मायदेशी परतला आहे. 

"वैद्यकीय पथक बुमराहवर वैद्यकीय उपचार करीत आहे. चौथ्या कसोटी सामन्यात तो फिट आहे की नाही हे उद्या समजणार आहे. जर तो खेळू शकला तर तो खेळायला मैदानावर उतरू शकेल, जर तो कसोटी सामन्यासाठी फीट नसेल तर तो खेळणार नाही." असे फलंदाजीचे प्रशिक्षक  विक्रम राठौर यांनी सांगितले.

भारताबरेबरच ऑस्ट्रेलिया संघाला देखील एका दुखापतीचा फटका बरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यात खेळू शकणार नाही. तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी विल पुकोव्हस्कीच्या हाताला गंभीर इजा झाली. त्याच्या जागी मार्कस हॅरीसला संघात घेण्यात आलं आहे. मार्कस हॅरिस डेव्हिड वॉर्नरसोबत चौथ्या सामन्यात सलामीला येणार आहे.

"जखमेवर अद्याप लक्ष ठेवले जात आहे. आमचे वैद्यकीय कर्मचारी त्याकडे काळजी पूर्वक लक्ष देत आहेत. मी आत्ता यासंबधी कुठलेही भाष्य करू शकणार नाही. असे विक्रम राठौर यांनी अंतिम कसोटीच्या पूर्वसंध्येला सांगितले.

१५ जानेवारीपासून ब्रिस्बेन इथं होणाऱ्या भारत - ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी आधी महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीआधी टीम इंडियात काही बदल होण्याची शक्यता आहे, नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

आणखी वाचा:

INDvsAUS : चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियावर संक्रांत,ऑस्ट्रेलियालाही दुखापतीचं ग्रहण -

संबंधित बातम्या