INDvsAUS रोहित शर्मासह त्या चारही खेळाडूंच्या कोरोना चाचणीचे रिपोर्टस्..

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जानेवारी 2021

तिसऱ्या मन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी सिडनीला रवाना झाला आहे.

मेलबर्न :  भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीला सिडनीत खेळवण्यात येणार आहे. या तिसऱ्या मन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी सिडनीला रवाना झाला आहे.

 भारतीय संघातील कसोटीपटूंनी मेलबर्नला जैवसुचा भंग करत मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये भोजन केले होते. त्यामुळे या सर्व पाचही खेळाडूंना विलगीकरणात ठेवले असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलं होतं. उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील पाच खेळाडूंचे शॉपिंग सेंटरमधील रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचे छायाचित्र ट्विट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. सिडनीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तिथे कसोटीचे आयोजन किती सुरक्षित असेल याची चर्चा होत असतानाच हे छायाचित्र प्रसिद्ध झाले. रोहित शर्मा, रिषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ यांनी चॅडस्टोन शॉपिंग सेंटरमधील सिक्रेट किचन या चायनीज नूडल आणि बीबीक्‍यू रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रांनी म्हटलं होतं. यानंतर या पाचही खेळाडूंसह संपूर्ण टीम इंडियाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने आता हे खेळाडू तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतील.

तिसरी कसोटी होणाऱ्या सिडनीत...

  •      मास्कचा वापर जास्त सक्तीचा
  •      नाईट क्‍लबमधील नाचण्यावर निर्बंध
  •      जिम क्‍लास, विवाह, अंत्यविधी तसेच धार्मिक ठिकाणी उपस्थितांच्या          संख्येत घट
  •      कसोटीस आता ५० टक्के उपस्थित
  •      अर्थव्यवस्था कार्यरत ठेवतानाच कोरोना रोखण्याकडेही लक्ष देण्याचे             धोरण

संबंधित बातम्या