INDvsAUS : तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला धक्का, हा गोलंदाज पुढचे दोन्ही सामने खेळणार नाही

वृत्संतस्था
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारताने संघात मोठा बदल केला आहे. शुक्रवारी बीसीसीआयने ट्विट केले आहे की जखमी उमेश यादवच्या जागी वेगवान गोलंदाज टी नटराजनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

मेलबर्न :  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारताने संघात मोठा बदल केला आहे. शुक्रवारी बीसीसीआयने ट्विट केले आहे की जखमी उमेश यादवच्या जागी वेगवान गोलंदाज टी नटराजनचा संघात समावेश करण्यात आला आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी उमेश यादवच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता.

यानंतर त्याचे स्कॅन करण्यात आले ज्यात असे आढळले की तो त्वरित बरे होण्याची शक्यता नाही आणि पुढील दोन सामने तो खेळू शकणार नाही. यानंतर, राष्ट्रीय निवड समितीने निर्णय घेतला की यादवच्या जागी तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नटराजनला संघात स्थान देण्यात येईल. यापूर्वी बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी शार्दुल ठाकूरला मोहम्मद शमीच्या जागी संघात स्थान देण्यात आले होते.
 

 

संबंधित बातम्या