INDvsAUS तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून भारतासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जानेवारी 2021

रेस्टॉरंटमध्ये जाऊन भोजन केल्यामुळे जैवसुरक्षा चौकटीचा नियम भंग केल्याचा कांगावा करून भारतीयांसमोर तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अडचणी निर्माण करण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून प्रयत्न केला जात आहे.

सिडनी :   रेस्टॉरंटमध्ये जाऊन भोजन केल्यामुळे जैवसुरक्षा चौकटीचा नियम भंग केल्याचा कांगावा करून भारतीयांसमोर तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अडचणी निर्माण करण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू संतापले असून प्राणिसंग्रहालयातील प्राणी म्हणून आमची गणती करू नका, असा दम भरला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ एकत्रितपणे मेलबर्नहून सिडनीत आज दाखल झाला. यात रेस्टॉरंटमध्ये भोजन करण्यास गेलेल्या पाचही खेळाडूंचा समावेश होता. जैवसुरक्षा नियमाचा भंग केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलिया सरकारने नियमावर बोट ठेवण्यास सुरुवात केली. प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊ शकतात आणि आमच्यावर मात्र विलगीकरणाचे सक्त नियम दाखवले जातात, अशा शब्दांत भारतीय संघातून प्रतिक्रिया उमटत आहेत.प्रेक्षक येऊन मुक्तपणे सामना पाहत आनंद घेऊ शकतात; आम्हाला मात्र मैदानावर खेळा आणि हॉटेलमध्ये गेल्यावर विलगीकरण करा असे नियम दाखवले जात आहेत हा प्रकार प्राणिसंग्रहालयातील प्राणी समजून केल्यासारखा आहे, अशी नाराजी संघव्यवस्थापनातील व्यक्तीने व्यक्त केली.

वेगवेगळे न्याय

ऑस्ट्रेलियातील जनतेला जे नियम आहे ते तुम्हालाही असतील असे आम्हाला सुरुवातीपासून सांगितले जात होते. या नियमानुसार स्टेडियममध्ये प्रेक्षक नसते तर या नियमाला अर्थ होता. त्यानुसार हॉटेलमध्ये जाऊन आम्ही अलगीकरण करणे यात काही तरी तारतम्य होते, असेही मत या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

मजलाही सोडू नका

काही वेळा हे नियम कमालीचे कडेकोट केले जात होते. हॉटेलमधील तुम्ही तुमच्या मजल्याच्याही बाहेर जायचे नाही, असे काही वेळा त्यांच्या वैद्यकीय टीमकडून सांगितले जायचे, पण संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याने हे नियम आम्ही स्वीकारणार नाही, असे थेट सांगितल्याचेही समजते.चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने दुसरा सामना जिंकून १-१ अशी बरोबरी

चाचण्या निगेटिव्ह

सर्व भारतीय खेळाडू आणि संघव्यवस्थापनातील प्रत्येक सदस्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, त्यामुळे भारतीय व्यवस्थापनाने निःश्‍वास सोडला आहे. परिणामी रोहित, गिल, पंत, सैनी यांचाही सिडनी कसोटी खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संघातील सर्व सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली आहे, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले. 

संबंधित बातम्या