INDvsENG : पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत; इंग्लंडची 1-0 अशी आघाडी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लड संघाने भारतावर विजय मिळवत विजयाची दणक्यात सुरुवात केली आहे.

 चेन्नई: चेन्नई मध्ये पार पडलेल्या इंडिया इंग्लड कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना कराव लागाला आहे. इंग्लडने भारतीय संघाचा 277 धावांनी पराभव करत चार कसोटीच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लड संघाने भारतावर विजय मिळवत विजयाची दणक्यात सुरुवात केली आहे. भारताला पहिल्या कसोटीत कशामुळे पराभवास सामोरे जावं लागले याची मिंमासा केल्यास अनेक कारणे आपल्या समोर येतील. चेन्नईच्या मैदानावर नाणेफेक जिंकत कर्णधार जो रुटने प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तसेच कर्णधार रुटने  भारतीय फिरकी गोलदांजाचा यशस्वीपणे सामना करत द्विशतकी खेळी केली. रुट याने  218  एवढी मोठी धावसंख्या उभारत संघाला बळकट केले. रुटच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लडने 578 धावसंख्या उभारली. मात्र दुसरीकडे भारताची तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्याची योजना अपयशापर्यंत घेवून गेली आहे. अश्विनचा अपवाद वगळता इतर फिरकीपटूंना आपला प्रभाव पाडता आला नाही. इंग्लडचे फिरकीपटू लीड आणि बेस यांच्यापुढे भारतीय दिग्गज खेळाडू टिकू शकले नाहीत.

IndvsEng Day 4th: अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संघ 178 धावांवर आटोपला;...

कर्णधार विराट कोहली,अजिंक्य राहणे,चेतेश्वर पुजारा यांना लवकर बाद करण्यात इंग्लडच्या फिरकीपटूंना यश आले. पहिल्या कसोटीत इंग्लडच्या फिरकीपटूंनी एकूण 11 बळी घेतले आहेत. अजिंक्य राहणे आणि रोहीत शर्मा यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लडच्या संघाला कर्णधार जो रुट याच्या नेतृत्वाखाली भारताविरुध्दाच्या पहिल्या कसोटीत विजय संपादन करता आला. रुटने संघातील गोलंदाजांचा योग्यरित्या वापर करत संघाला विजय मिळवून दिला. सामना दरम्यान असे अनेक निर्णय घेत रुटने इंग्लडला विजय मिळवून दिला.

संबंधित बातम्या