INDvsENG: सॅमनं यापूर्वी दिलं होत टीम इंडियाला टेन्शन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात सॅम कुरेन याने शानदार खेळी केली. इंग्लंडकडून नाबाद 95 धावा करणारा सॅम कुरेन याला मॅन ऑफ द मॅच तर जॉनी बेअरस्टोला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आले.

INDvsENG: टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात सॅम कुरेन याने शानदार खेळी केली. इंग्लंडकडून नाबाद 95 धावा करणारा सॅम कुरेन याला मॅन ऑफ द मॅच तर जॉनी बेअरस्टोला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या वनडे सामन्यात सात धावांनी विजय नोंदवत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असे पराभूत केले. शेवटच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 329 धावा केल्या होत्या.  

बिकट अवस्थेत केला लक्ष्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

त्यानंतर धावांचा पाठलाग करताना सॅम करन याने  जबरदस्त फलंदाजी करत 95 धावांची नाबाद खेळी केली. 7 बाद  200 अशी बिकट अवस्था झाली असताना त्याने संघाला लक्ष्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आठव्या क्रमांकावर उतरल्यानंतर सॅम कुरेनने आपल्या डावात नऊ चौकार आणि तीन षटकार ठोकले. परंतु तो संघाला  विजय मिळवून देऊ शकला नाही. टीम इंडियाने अखेरचा सामना 7 धावांनी जिंकत मालिका खिशात घातली.  या संपूर्ण मालिकेदरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना अटीतटीचा झाल्याचे पाहायला मिळाले. सॅम कुरेन हा यामागील एकमेव मोठे कारण ठरला. ज्याने शेवटच्या सामन्यात भारताला सहज जिंकण्याच्या आशेवर रोखून धरले होते.

INDvsENG: हार्दिक पांड्याने हात जोडून मागितली टिम इंडियाची माफी; व्हिडिओ व्हायरल 

हि पहीली वेळ नव्हती

सॅम कुरेनने भारताला अशा परिस्थितीत टाकण्याची  ही पहिली वेळ नव्हती. 2018 मध्ये जेव्हा टीम इंडिया इंग्लंडच्या दौर्‍यावर गेली होती तेव्हा त्यांनी विराट कोहलीच्या संघाला अशाच  अडचणीत टाकले होते. 22 वर्षीय सॅम कुरेनने आतापर्यंत इंग्लंडकडून आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. अल्पावधीत त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केली असून त्याच्याकडे भविष्यातील उत्तम खेळाडू म्हणून पाहिले जाते. सध्याच्या घडीला  लोअर ऑर्डरमधील तो एक उत्तम  फलंदाज आहे. त्याचबरोबर तो गोलंदाजीमध्ये ही त्याचा पराक्रम बघायला मिळतो. आतापर्यंत त्याने आपल्या खेळाने सर्वांना वेड लावले आहे. 2018 मधील इंग्लंड दौर्‍यावर याचा पहिला नमुना पाहायला मिळाला होता. भारताविरूद्धच्या बर्मिंघॅम कसोटीत त्याने पराक्रम दाखविला होता आणि पहिल्या डावात आघाडी घेण्यास भारताला रोखले होते.

या दरम्यान त्याने मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या या इंडियन खेळाडूंच्या विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या दुसर्‍या डावात त्याने आठव्या क्रमांकावर उतरल्यानंतर 63 धावा केल्या. भारताला विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्यापासून भारत 27 धावा दूर गेला होता. या सामन्यात सॅम कुरेनने दोन्ही डावात 87 धावा केल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. या खेळामुळे तो सामनावीर म्हणून निवडला गेला. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला हा फक्त दुसरा सामना होता. 

 बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये सॅम कुरेनने सोडलीय विशेष छाप 

या मालिकेत त्याने चार सामन्यांत 38.85 च्या सरासरीने 272 धावा केल्या. सर्वाधिक धावांच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर होता. या दरम्यान सामन्यात अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, हार्दिक पंड्या आणि किटन जेनिंग्ज या फलंदाजांपेक्षा सॅम कुरेन पुढे होता. आणि विकेट घेताना त्याचे योगदानही तितकेच होते. सॅम कुरेनने चार कसोटी सामन्यांत भारताविरुद्ध 11 गडी बाद केले. जेम्स अँडरसन, ईशांत शर्मा, स्टुअर्ट ब्रॉड, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह हे नावाजलेले आणि प्रसिद्ध गोलंदाजात त्याने विशेष छाप सोडली होती.  आता या मालिकेपासून सॅम कुरेनची प्रसिद्धी आधिक वाढली तर नवल वाटायल नको. आयपीएलमध्ये त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षाही त्याच्या संघाला असेल.

संबंधित बातम्या