INDvsENG: वर्ल्ड कप फायनलमध्ये असे झाले असते तर? क्रिकेटविश्वात पेटला नवा वाद

INDvsENG: वर्ल्ड कप फायनलमध्ये असे झाले असते तर? क्रिकेटविश्वात पेटला नवा वाद
INDvsENG: What if that happened in the World Cup final A new controversy erupted in the cricket world

ऋषभ पंतच्या चौकार वादामुळे क्रिकेटविश्वात एक नवीन वादविवाद पेटला आहे. भारताचा माजी क्रिकेटर आणि टीकाकार आकाश चोप्राने नाबाद असूनही ऋषभ पंतला चार धावा न मिळाल्यामुळे खूप नाराज आहेत. आकाशने आयसीसीच्या डेड बॉलच्या या नियमांवरही मोठा प्रश्न विचारला आहे.

"वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या बॉलवरही असेच काही घडले असते तर काय झाले असते?" असे असा प्रश्न करत त्याने हे ट्विट केले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात चेंडूने पंतच्या फलंदाजीची सीमा ओलांडली होती, परंतु एलबीडब्ल्यूमुळे एकाही रनाची भर पडू शकली नाही.

"तर, पंच चुकल्यामुळे पंतला चार धावांना मुकावं लागलं. 101010364 व्या वेळी रीपीट करून वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या बॉलवर असे घडले असते आणि फलंदाजीच्या संघाला जिंकण्यासाठी 2 धावा हव्या असत्या तर? विचार करा," असे ट्विट आकाशने केले आहे.

भारतीय संघाच्या 40 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप शॉट लावण्याचा प्रयत्न  पंतने केला होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क साधला जाऊ शकला नाही. इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी चेंडू पॅडवर लागल्याचे जाणवले आणि त्यांनी जोरदार अपील केली. ऑन फील्ड पंचाने पंतलाही बाद केले. त्यानंतर पंतने डीआरएसचा वापर केल्यामुळे हे स्पष्ट झाले की चेंडू पंतच्या बॅटला लागून बॉड्री पार गेला आहे आणि मैदानातील पंचांचा निर्णय बदलला आणि पंतला नाबाद सांगितले गेले मात्र असे असूनही, क्रिकेट नियमांनुसार ते चार रन पंत आणि संघाच्या खात्यात भर नाही टाकू शकले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com