INDvsING: "भारत इंग्लंड कसोटी मालिकेला तेंडुलकर आणि या खेळाडूचं नाव द्या"

INDvsING: "भारत इंग्लंड कसोटी मालिकेला तेंडुलकर आणि या खेळाडूचं नाव द्या"
INDvsING Monty Panesar said Eng vs India test series should be called Tendulkar Cook trophy

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने नुकतेच शेतकरी आंदोलनासंदर्भात  ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटनंतर क्रिकेट क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला होता. या दरम्यान त्याला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. अजूनही भारतीयांच्या मनातील सचिनबद्दलचा रोष कमी झालेला दिसून येत नाही.

याच दरम्यान इंग्लंडचा फिरकीपटू मॉन्टी पानेसरने नुकत्याच केलेल्या एका मागणीवरून सचिनच्या विरोधकांनी त्याला जोरदार ट्रोल केले आहे.मॉन्टी पानेसरने भारत इंग्लंड टेस्ट सिरीजला ‘तेंडुलकर-कुक ट्रॉफी’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. कसोटी सामन्यांमध्ये आपापल्या देशांमध्ये खेळल्या गेलेल्या तेंडुलकर आणि कुक यांच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे, मात्र या दोन्ही खेळाडूंच्या नावावर कोणतीही सीरिज नाही, म्हणून आगामी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला ‘तेंडुलकर-कुक ट्रॉफी’ असे नाव देण्याचा मागणी मॉन्टी पानेसरने केली आहे.

हल्ली सचिनवर नाराज असलेल्या क्रिकेटप्रेमींनी मॉन्टीने केलेल्या या ट्विटवर त्याला चांगलेच सुनावले आहे. “आता भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी सचिन क्रिकेटचा देव राहीला नाही”, “बोथम-कपिल असे नाव का नाही?” अशा शब्दात काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यापेक्षा‘भज्जी-पानेसर ट्रॉफी’ असे नाव ठेवण्याचा सल्लाही एकाने दिला आहे. त्याचबरोबर यूझर्सनी विचारलेल्या काही महत्वपूर्ण प्रश्नांना मॉन्टीने प्रामाणिकपणे उत्तरे दिली आहेत.सध्या सुरु असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत विरोधी संघाने पहिल्या सामन्यातच भारताला पराभवाचे पाणी पाजले आहे. थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 227 धावांनी त्यांनी भारताला पराभूत केले आहे. आता यानंतर होणरा पुढील कसोटी सामना 13 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे समस्त क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com