INDvsING: अश्विनच्या शतकानंतर त्याच्या पत्नीचा 'षटकार', ट्विट तुफान व्हायरल

INDvsING: अश्विनच्या शतकानंतर त्याच्या पत्नीचा 'षटकार', ट्विट तुफान व्हायरल
INDvsING R Ashwins wife twitted after Ashwins century, tweet goes viral

INDvsING: चेन्नईच्या चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल नाही अशी टिका सुरू असतांना, आज त्याच मैदानावर आज रविचंद्रन अश्विनने शानदार शतक करून टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. पहिल्याच डावात अश्विनने आपल्या फिरकी गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना  चांगलेच नाकीनऊ आणले होते. चेन्नई मधिल पॉकच्या ज्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ, इंग्लंडच्या मायकेल वॉघन यांनी टीका केली होती, आज त्याच विकेटवर अश्विनने शतक मिळवून दाखवले आहे. पहिल्या डावात  इंग्लंडच्या 5 विकेट घेणाऱ्या अश्विनने भारताच्या दुसर्‍या डावात शतक झळकावून त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. 

या मैदानावर फलंदाजी करणे कठीण मानल्या जाते. अश्विनचे ​​चाहते अश्विनच्या या  शतकाचे ट्विटरवर खूप कौतूक करत आहेत. चेपॉकच्या या खेळपट्टीवर अश्विनला ​​हे शतक करणे इतके सोपे नव्हते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. पण उत्तम प्रयत्न करूनही इंग्लंडचा संघ या स्टार खेळाडूला शतक ठोकण्यापासून रोखू शकला नाही.

आर अश्विनच्या या अर्धशतकानंतर त्याची पत्नी प्रिथी अश्विन सुद्धा स्वत:ला ट्विट करण्यापासून रोखू शकली नाही. तिने गंमतीशीर टि्वट करून चेपॉकच्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांवर चांगलाच टोला हाणला आहे. ‘माझा नवरा प्रत्येकाला ट्रोल करतोय #win50’ असे कॅप्शन प्रिथी अश्विने आपल्या टि्वट मध्ये दिले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com