Ing Vs Eng: विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

Ing Vs Eng: विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
Ing Vs Eng Virat equals Sachins record

पुणे: भारत-इंग्लंड यांच्यात तीन दिवसीय वनडे सामन्यांची मालिका पुण्यातील महाराष्ट्र असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरु झाली आहे. भारताने काल खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडला 66 धावांनी मात दिली. विराटने पहिल्या डावात चांगला फॉर्म राखत दमदारपणे अर्धशतक ठोकले. या अर्धशतकासह विराटने मास्टर ब्लास्टरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

विराटने इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 61 वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननंतर विराटने घरच्या मैदानावर 10,000 धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीने आपल्या 176 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतची कोणत्याही फलंदाजाची मोठी कामगिरी मानली जाते. विराटने आत्तापर्य़ंत 432  सामन्यात 55 च्या सरासरीने 22689 धावा केल्या आहेत. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आघाडीवर आहे. सचिनने कारकिर्दीत 48 च्या सरासरीने 664 सामन्यामध्ये 43357 आंतरराष्ट्रीय धावा काढल्या आहेत. विराट कोहलीने अर्धशतक करत दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस याला मागे टाकले आहे. (Ing Vs Eng Virat equals Sachins record)

विराटने 104 वेळा वन डे सामन्यामध्ये अर्धशतके झळकावली आहेत. तर जॅक कॅलिसने 103 वेळा अशी कामगिरी केली आहे. विराटने मार्क वूडच्या चेंडूवर झेलबाद होण्याआगोदर 60 चेंडूमध्ये 56 धावा काढल्या होत्या. शिखर धवनबरोबर विराटने दुसऱ्या विकेटसाठी 102  धावांची भागिदारी केली. त्याने आपल्या खेळी दरम्यान 6 चौकार लगावले. मात्र विराटला शतक लगावण्यात अपयश आले आहे. 2019 मध्ये बांग्लादेशविरुध्द विराटने डे-नाईट टेस्टमध्ये शतक ठोकले होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2019 मध्ये वेस्टइंडिजविरुध्द अर्धशतक ठोकले होते.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com