पेडणे तालुक्यात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

देशपातळीवरील खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न करा ; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
पेडणे तालुक्यात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
योग्य ते प्रशिक्षण घेवून चागल्या दर्ज्याचे खेळाडू बना असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले

मोरजी: पेडणे तालुक्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान होणार आहे, शिवाय 35 कोटी रुपये खर्च करून सावळवाडा पेडणे येथे इंडोर स्टेडीयम उभारलेला आहे या साधन सुविधाचा खेळाडूनी योग्य तो वापर करून आपले नाव राष्ट्रीय पातळीवर करावे, योग्य ते प्रशिक्षण देण्याकरिता कोरगाव येथील अनिकेत देसाई यांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे, त्याच्याकडून योग्य ते प्रशिक्षण घेवून चागल्या दर्ज्याचे खेळाडू बना असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नागझर येथे मुख्यमंत्री चषक निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

या वेळी सरपंच संजय तुळसकर, भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मंदार परब, चांदेल सरपंच संतोष मळीक, आबा तळकटकर, प्रदीप कांबळी, ज्ञानेश्वर परब, तुलसीदास कवठणकर आदी उपस्थित होते.

योग्य ते प्रशिक्षण घेवून चागल्या दर्ज्याचे खेळाडू बना असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले
नवोदितांना लक्ष वेधण्याची संधी; 25 वर्षांखालील वनडे स्पर्धेत गोव्याची सलामी रेल्वेशी

उमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोलताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून एकूण ३० विविध प्रकारच्या खेळातून प्रतीनिधित्व करावे आणि या तीसही खेळातून आपल्या पेडणे तालुक्यातून सर्व खेळाडून आपला सहभाग दाखवून पेडणे तालुका खेळातही मागे नाही हे दाखवून द्यायचे आहे असे आवाहन केले. खेळातून आपले शाररीक तन्दुरुस्था अबाधित राहून आपल्याला पुढील लक्ष्य गाठायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करून आतापासूनच अश्या खेळांचे योग्य ते प्रशिक्षण घ्यायला हवे असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले.

योग्य ते प्रशिक्षण घेवून चागल्या दर्ज्याचे खेळाडू बना असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले
T20 World Cup 2021 मधून पाकिस्तान बाहेर, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये !

यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष मंदार परब यांनी बोलताना खेळातून आपल्याला पेडणे तालुक्याचे नाव उज्ज्वल करायचे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी ज्या ज्या खेळासाठी साधन सुविधा तयार केल्या त्याचा लाभ घेवूया असे सांगितले. सरपंच संजय तुळसकर यांनी स्वागत आणि आभार मानले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com