इंझमामनं ऋषभ पंतचं तोंडभरुन केलं कौतुक

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

ऋषभ पंत ज्यावेळी फलंदाजी करतो त्यावेळी आपण विरेंद्र सेहवागलाच डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहतो असं इंझमामने म्हटले आहे.

भारत- इंगंलड यांच्यात पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्य़े भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने केलेल्या झुंजार खेळीमुळे त्याची क्रिकेटविश्वात दखल घेतली गेली असून त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने शतकी खेळी करत भारताला सामन्यासोबत कसोटी मालिका विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला. पाकिस्तान संघाचा माजी कर्णाधार इंझमामनेही ऋषभ पंतच्या खेळीचे अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे. ऋषभ पंत ज्यावेळी फलंदाजी करतो त्यावेळी आपण विरेंद्र सेहवागलाच डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहतो असं इंझमामने म्हटले आहे. तसेच कितीही दबाव असला तरी त्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही, हा सेहवागचा गुणधर्म पंतमध्ये आला असल्याचं इंझमामने म्हटलं आहे. 

आयपीएल 2021 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; 9 एप्रिलपासून सुरू होणार

''पंत हा एक उत्तम खेळाडू आहे. बऱ्याच दिवसांनी असा खेळाडू पाहिला आहे की, जो कोणताही दबाव न घेता आपल्या फंलंदाजीचे उत्तम प्रदर्शन करत असतो. 146 धावांवर सहा फलंदाज आऊट झाले असताना पंत ज्याप्रकारे सुरुवात करतो तसं इतर कोणालाही जमणार नाही. तो आपला शॉट खेळत असतो. आणि य़ावेळी खेळपट्टी कशी आहे, समोरच्या संघाने किती धावा केल्या आहेत याचा त्याला कोणताही परक पडत नाही. फिरकी गोलंदाज असो की, जलद गोलंदाज असो त्याची खेळी उत्तम आहे. तो ज्यावेळी खेळत होता ते पाहुन मी सुध्दा आनंद लुटत होतो. जणू काही विरेंद्र सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत होतो.’’

''पंतने भारताताच उत्तम खेळ खेळतो असं नाही तर त्याने ऑस्ट्रेलियामध्येही त्याने चांगली खेळी केली होती. तो आपल्या वेगाने खेळत असल्याकारणाने जास्त शतके करु शकला नाही. भारताकडे सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड होता.. आता विराट आणि रोहीत आहेत. परंतु ऋषभ पंत ज्या पध्दतीने तो खेळतो ते जबरदस्त आहे. ज्या पध्दतीचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे मी असा खेळाडू क्रिकेटमध्ये पाहिला नाही,'' असंही यावेळी इंझमामने म्हटले.

संबंधित बातम्या