इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना एक कोटीचा खर्च करून आणणार

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

लंडनमध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका पूर्ण झाल्यावर आयपीएल खेळणारे यातील खेळाडू लवकरात लवकर उपलबद्ध व्हावेत यासाठी सर्व फ्रॅंचाईजने कंबर कसली आहे.

नवी दिल्ली: लंडनमध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका पूर्ण झाल्यावर आयपीएल खेळणारे यातील खेळाडू लवकरात लवकर उपलबद्ध व्हावेत यासाठी सर्व फ्रॅंचाईजने कंबर कसली आहे. त्यासाठी ते एक कोटी अतिरिक्त खर्च करणार आहेत. लंडन ते दुबई असा प्रवास खासगी विमानाने करण्यात येणार आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळत असलेल्या खेळाडूंपैकी २२ खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता इतर सात संघांत त्यांचा समावेश आहे. लंडनमधील मालिका मॅंचेस्टर येथे संपणार आहे. त्यामुळे मॅंचेस्टर ते दुबई असा प्रवास केला जाणार आहे.

कसा असेल हा प्रवास

  •  निर्जंतुक केलेल्या बसमधून खेळाडूंचा स्टेडियम ते विमानतळ प्रवास
  •  या बसचा चालक इंग्लंड मंडळाच्या जैवसुरक्षा नियम चौकटीतील असणार
  •  विमानतळावर इमिग्रेशनची प्रक्रिया लवकरात लवकर करावी लागणार
  •  त्यामुळे खेळाडूंना कमीत कमी वेळ विमानतळावर राहावे लागेल
  •  ज्या खासगी विमानाने प्रवास केला जाणार, ते विमानही पूर्णपणे निर्जंतुक केले जाणार
  •  हे विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी वेगळ्या विमानतळावर उतरवण्यात येणार
  •  विमानतळ ते हॉटेल या प्रवासाचा खर्च फ्रॅंचाईजना करावा लागणार
     

संबंधित बातम्या