बीसीसीआयची चिंता वाढली: वैद्यकीय अधिकाऱ्यालाच कोरोना

बीसीसीआयची चिंता वाढली: वैद्यकीय अधिकाऱ्यालाच कोरोना
IPL 2020: BCCI Senior medical officer tests COVID-19 positive

दुबई,: आयपीएलचा मुहूर्त जसा जवळ येत आहे तशा बीसीसीआयसमोर अडचणी वाढत आहेत. कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या वाढत आहेत. अमिरातीत गेलेल्या बीसीसीआयच्या वैद्यकीय टीममधील अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर बंगळुर येथील क्रिकेट अकादमीच्या दोन अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय टीममधील एका सीनियर अधिकाऱ्याला कोरोना झाला आहे, पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहेत. सध्या तरी त्यांच्या संपर्कात कोणीही आलेले नव्हते, परंतु दुबई विमानप्रवासात इतरांची संपर्क आलेला असून शकेल, आता त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत असून काही दिवसांत पुढची चाचणी करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. बंगळुर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील दोघा अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्तालाही बीसीसीआयकडून दुजोरा देण्यात आला.आयपीएलसाठी अमिरातीत गेलेल्यांपैकी ११ सपोर्ट स्टाफ आणि दोन खेळाडूंना कोरोना झाल्याचे २९ ऑगस्ट रोजी स्पष्ट करण्यात आले होते. बीसीसीआयकडून या बाधितांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. आता आयपीएलशी संबंधित बीसीसीआयच्या वैद्यकीय टीममधील अधिकाऱ्यालाच कोरोना झाल्यामुळे चिंता वाढली आहे. 

चेन्नई संघातील इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली; परंतु त्या १३ सदस्यांचा अपवाद वगळता सर्वजण निगेटिव्ह आहेत, असा दिलासा चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्‍वनाथन यांनी दिला. त्यामुळे हे खेळाडू उद्यापासून सराव सुरू करण्याची शक्‍यता आहे. चेन्नईचा संघ २० ऑगस्ट रोजी दुबईत दाखल झालेला आहे; परंतु अद्याप त्यांना सरावाची संधी मिळालेली नाही.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com