आयपीएल २०२०: महेंद्रसिंग धोनीचे प्रत्युत्तर की टीकाकार बेदखल?

IPL 2020: Can MS Dhoni turn the tide for Super Kings
IPL 2020: Can MS Dhoni turn the tide for Super Kings

दुबई: संघाला गरज असताना वरच्या क्रमांकावर फलंदाजीस न आलेल्या महेंद्रसिंग धोनीवर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी कडाडून टीका केल्यानंतर काही तासांतच धोनीच्या चेन्नईचा सामना दिल्लीविरुद्ध उद्या होत आहे. सामन्याच्या निकालापेक्षा आपल्या क्रमांकात बदल करतो की टीकाकारांना बेदखल करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

एक विजय एक हार अशी सुरुवात करणाऱ्या चेन्नईचा हा सात दिवसांतला तिसरा सामना आहे. आयसीसीचे तिन्ही करंडक जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. आपल्या टर्मवर तो नेतृत्वही करत असतो. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी धोनी आपल्याला जे योग्य वाटते तेच करणार असल्याची शक्‍यता अधिक आहे.सामना हातून निसटल्यावर स्वतः फलंदाजीस येतो, असा कर्णधार असतो का? अशी टीका गंभीरने कालच केली होती. 

लक्षवेधक
ठिकाण : दुबई
हवामानाचा अंदाज : दिवसभर ढगाळ हवामान, त्यात ४० अंश तपमान ही स्थिती असेल, पण रात्री तापमान काहीसे कमी होईल, पण उकाडा कमी होण्याची शक्‍यता कमी
खेळपट्टीचा अंदाज : फलंदाजांना पूर्ण साथ देणारी खेळपट्टी. चौकार आणि षटकारांची बरसात झाली नाही तरच आश्‍चर्य. चेंडू क्वचित कमी वेगाने येण्याची शक्‍यता. फिरकी गोलंदाज प्रसंगी प्रभावी ठरू शकतील.

प्रतिस्पर्ध्यांसमोरील प्रश्‍न आणि...

  •     चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात शेन वॉटसनला आलेले अपयश, तसेच आघाडीच्या फलंदाजांचा धावांचा दुष्काळ ही चेन्नईची डोकेदुखी
  •     पृथ्वी शॉ, शिखर धवन या दिल्ली सलामीवीरांना सूर गवसणार, त्यांना मधल्या फळीची कितपत साथ लाभणार. कागासो रबाडाचा कितपत प्रभाव पडणार हा प्रश्‍न
  •     अश्‍विनविना दिल्ली संघ
  •      नावाजलेले गोलंदाज असूनही चेन्नईचा सूर हरपलेला
  •     अंबाती रायडू, द्वेन ब्राव्हो न खेळण्याची शक्‍यता 
     

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com