आयपीएल २०२०: चहल आमच्यासाठी गेम चेंजर - विराट कोहली

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

हैदराबादविरुद्धचा सामना हातातून निसटत चालला असतानाच युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूंत दोन विकेट मिळवल्या आणि सामना बंगळूर संघाच्या बाजूने झुकवला. चहल हा आमच्यासाठी ‘गेम चेंजर’ असल्याचे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

दुबई:  हैदराबादविरुद्धचा सामना हातातून निसटत चालला असतानाच युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूंत दोन विकेट मिळवल्या आणि सामना बंगळूर संघाच्या बाजूने झुकवला. चहल हा आमच्यासाठी ‘गेम चेंजर’ असल्याचे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

गतमोसमात सुरुवातीचे सलग सहा सामने गमावणाऱ्या विराट कोहलीच्या बंगळूर संघावर कालही सलामीचा सामना गमावण्याची वेळ आली होती; परंतु १६४ धावा केल्यावर त्यांना केवळ १० धावांनी विजय मिळवण्यावर समाधान मानावे लागले.

लेग स्पिनर चहलने कमाल केली. त्याने चार षटकांत अवघ्या १८ धावा देताना तीन विकेट मिळवल्या. डोईजड जाणाऱ्या जॉनी बेअरस्टॉला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर चहलने विजय शंकरचा गुगलीवर त्रिफाळा उडवला. त्याअगोदर त्याने मनीष पांडेची विकेट मिळवली होती.

आम्ही प्रामुख्याने फारच चांगला संयम दाखवला. हैदराबादला अखेरच्या पाच षटकांत ४३ धावांची गरज होती, त्या वेळी अखेरपर्यंत कोणीही हार मानायची नाही. कोणत्याही क्षणी कलाटणी मिळू शकते, असे मी सर्वांना सांगितले होते आणि योग्य वेळी ‘युझी’ने एका षटकात ही करामत केली, असे विराटने सांगितले. 

चहलचे कौतूक करताना विराट पुढे म्हणाला, प्रत्येक फिरकी गोलंदाजाला खेळपट्टीकडून तेवढी साथ मिळत नव्हती; परंतु चहलने आपल्या मनगटातील क्षमतेने तो कोणत्याही खेळपट्टीवर कमाल करू शकतो, हे दाखवून दिले.  

संबंधित बातम्या