आयपीएल-२०२०: मुंबई वि. चेन्नई सलामीला धमाका

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

स्पर्धेला १४ दिवस असताना आयपीएलचे वेळापत्रक जाहीर

मुंबई: ,बहुप्रतिक्षेत असलेले आयपीएल-२०२० चे वेळापत्रक अखेर स्पर्धेला १४ दिवस शिल्लक असताना जाहीर करण्यात आले. प्रथेनुसार गतविजेते आणि उपविजेते अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातच सलामीचा बार उडणार आहे. 

सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून वेळापत्रक तयार करण्यात बीसीसीआयला अखेर यश आले. १९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ५६ साखळी सामने होतील, त्यानंतर प्लेऑफच्या लढती होतील. प्लेऑफचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल.

आयपीएलचे सर्व आठही संघ अमिरातीत दाखल झाल्यावर वेळापत्रक जाहीर होणे अपेक्षित होते; परंतु चेन्नई संघातील १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना सराव करता आला नव्हता. परिणामी चेन्नई संघाला काही दिवस सरावासाठी मिळण्याकरिता त्यांच्या लढती उशिराने सुरू करण्याची चर्चा होती; परंतु महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाने काही दिवसांच्या सरावत आपण सज्ज होऊ, असा संदेश दिल्यानंतर वेळापत्रकाचा अडथळा पार झाला. 

रोहितचा शब्द खरा ठरणार
महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने धोनीच्या कारकिर्दीचा गौरव करताना १९ सप्टेंबरला टॉससाठी भेटू, असे ट्विट केले होते. रोहितचा हा शब्द आता खरा ठरणार आहे. 

दृष्टिक्षेपात आयपीएल २०२०

 •  १९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान ५६ साखळी सामने
 •  त्यानंतर प्लेऑफ आणि १० नोव्हेंबरला अंतिम सामना
 •  १० दिवशी प्रत्येकी दोन सामने
 •  दुपारचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३०, तर सायंकाळचे सामने ७.३० ला सुरू होणार.
 •  दुबईत २४, अबुधाबीत २० आणि शारजात १२ साखळी सामने.

आयपीएल २०२० वेळापत्रक

 • १९ सप्टेंबर ः मुंबई वि. चेन्नई (अबुधाबी) ७.३०
 • २० सप्टेंबर ः दिल्ली वि. पंजाब (दुबई) ७.३०
 • २१ सप्टेंबर ः हैदराबाद वि. बेंगळूरु (दुबई) ७.३०
 • २२ सप्टेंबर ः राजस्थान वि. चेन्नई (शारजा) ७.३०
 • २३ सप्टेंबर ः कोलकाता वि. मुंबई (अबुधाबी) ७.३०
 • २४ सप्टेंबर ः पंजाब वि. बेंगळूरु (दुबई) ७.३०
 • २५ सप्टेंबर ः चेन्नई वि. दिल्ली (दुबई) ७.३०
 • २६ सप्टेंबर ः कोलकाता वि. हैदराबाद (अबुधाबी) ७.३०
 • २७ सप्टेंबर ः राजस्थान वि. पंजाब (शारजा) ७.३०
 • २८ सप्टेंबर ः बेंगळूरु वि. मुंबई (दुबई) ७.३०
 • २९ सप्टेंबर ः दिल्ली वि. हैदराबाद (अबुधाबी) ७.३०
 • ३० सप्टेंबर ः राजस्थान वि. कोलकाता (दुबई) ७.३०
 • १ ऑक्‍टोबर ः पंजाब वि. मुंबई (अबुधाबी) ७.३०
 • २ ऑक्‍टोबर ः चेन्नई वि. हैदराबाद (दुबई) ७.३०
 • ३ ऑक्‍टोबर ः बेंगळूरु वि. राजस्थान (अबुधाबी) ३.३०
 • ३ ऑक्‍टोबर ः दिल्ली वि. कोलकाता (शारजा) ७.३०
 • ४ ऑक्‍टोबर ः मुंबई वि. हैदराबाद (शारजा) ३.३०
 • ४ ऑक्‍टोबर ः पंजाब वि. चेन्नई (दुबई) ७.३०
 • ५ ऑक्‍टोबर ः बेंगळूरु वि. दिल्ली (दुबई) ७.३०
 • ६ ऑक्‍टोबर ः मुंबई वि. राजस्थान (अबुधाबी) ७.३०
 • ७ ऑक्‍टोबर ः कोलकाता वि. चेन्नई (अबुधाबी) ७.३०
 • ८ ऑक्‍टोबर ः हैदराबाद वि. पंजाब (दुबई) ७.३०
 • ९ ऑक्‍टोबर ः राजस्थान वि. दिल्ली (शारजा) ७.३०
 • १० ऑक्‍टोबर ः पंजाब वि. कोलकाता (अबुधाबी) ३.३०
 • १० ऑक्‍टोबर ः चेन्नई वि. बेंगळूरु (दुबई) ७.३०
 • ११ ऑक्‍टोबर ः हैदराबाद वि. राजस्थान (दुबई) ३.३०
 • ११ ऑक्‍टोबर ः मुंबई वि. दिल्ली (अबुधाबी) ७.३०
 • १२ ऑक्‍टोबर ः बेंगळूरु वि. कोलकाता (शारजा) ७.३०
 • १३ ऑक्‍टोबर ः हैदराबाद वि. चेन्नई (दुबई) ७.३०
 • १४ ऑक्‍टोबर ः दिल्ली वि. राजस्थान (दुबई) ७.३०
 • १५ ऑक्‍टोबर ः बेंगळूरु वि. पंजाब (शारजा) ७.३०
 • १६ ऑक्‍टोबर ः मुंबई वि. कोलकाता (अबुधाबी) ७.३०
 • १७ ऑक्‍टोबर ः राजस्थान वि. बेंगळूरु (दुबई) ३.३०
 • १७ ऑक्‍टोबर ः दिल्ली वि. चेन्नई (शारजा) ७.३०
 • १८ ऑक्‍टोबर ः हैदराबाद वि. कोलकाता (अबुधाबी) ३.३०
 • १८ ऑक्‍टोबर ः मुंबई वि. पंजाब (दुबई) ७.३०
 • १९ ऑक्‍टोबर ः चेन्नई वि. राजस्थान (अबुधाबी) ७.३०
 • २० ऑक्‍टोबर ः पंजाब वि. दिल्ली (दुबई) ७.३०
 • २१ ऑक्‍टोबर ः कोलकाता वि. बेंगळूरु (अबुधाबी) ७.३०
 • २२ ऑक्‍टोबर ः राजस्थान वि. हैदराबाद (दुबई) ७.३०
 • २३ ऑक्‍टोबर ः चेन्नई वि. मुंबई (शारजा) ७.३०
 • २४ ऑक्‍टोबर ः कोलकाता वि. दिल्ली (अबुधाबी) ३.३०
 • २४ ऑक्‍टोबर ः पंजाब वि. हैदराबाद (दुबई) ७.३०
 • २५ ऑक्‍टोबर ः बेंगळूरु वि. चेन्नई (दुबई) ३.३०
 • २५ ऑक्‍टोबर ः राजस्थान वि. मुंबई (अबुधाबी) ७.३०
 • २६ ऑक्‍टोबर ः कोलकाता वि. पंजाब (शारजा) ७.३०
 • २७ ऑक्‍टोबर ः हैदराबाद वि. दिल्ली (दुबई) ७.३०
 • २८ ऑक्‍टोबर ः मुंबई वि. बेंगळूरु (अबुधाबी) ७.३०
 • २९ ऑक्‍टोबर ः चेन्नई वि. कोलकाता (दुबई) ७.३०
 • ३० ऑक्‍टोबर ः पंजाब वि. राजस्थान (अबुधाबी) ७.३०
 • ३१ ऑक्‍टोबर ः दिल्ली वि. मुंबई (दुबई) ३.३०
 • ३१ ऑक्‍टोबर ः बेंगळूरु वि. हैदराबाद (शारजा) ७.३०
 • १ नोव्हेंबर ः चेन्नई वि. पंजाब (अबुधाबी) ३.३०
 • १ नोव्हेंबर ः कोलकाता वि. राजस्थान (दुबई) ७.३०
 • २ नोव्हेंबर ः दिल्ली वि. बेंगळूरु (अबुधाबी) ७.३०
 • ३ नोव्हेंबर ः हैदराबाद वि. मुंबई (शारजा) ७.३०

संबंधित बातम्या