आयपीएल २०२०: चेन्नई संघाचा सराव ४ तारखेपासून

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

कोरोनाची बाधा झालेल्या त्या १३ सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही याचा संसर्ग झालेला नाही, असे चेन्नई संघाकडून स्पष्ट करण्यात आले आणि त्या १३ सदस्यांव्यतिरिक्त उर्वरित खेळाडूंचे सराव शिबिर ४ तारखेपासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 

नवी दिल्ली:  कोरोनाची बाधा झालेल्या त्या १३ सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही याचा संसर्ग झालेला नाही, असे चेन्नई संघाकडून स्पष्ट करण्यात आले आणि त्या १३ सदस्यांव्यतिरिक्त उर्वरित खेळाडूंचे सराव शिबिर ४ तारखेपासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 

चेन्नई संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे सर्व खेळाडूंबाबत अतिशय दक्षता घेण्यात येत आहे. बाधित झालेल्या १३ सदस्यांचे वेगळ्या हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात आले, तर इतर खेळाडूंची आणखी चाचण्या करण्यात आल्या, त्यातून सर्व खेळाडू निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

चेन्नईचा संघ २१ ऑगस्टला दुबईत दाखल झालेला आहे. २८ ऑगस्टपासून सराव सुरू होणे अपेक्षित होते, परंतु अजूनही ते मैदानात उतरलेले नाहीत.

संबंधित बातम्या