आयपीएल २०२०: कोलकातासाठी विजयाचे ‘शुभमन’

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

गिलचे शानदार अर्धशतक; हैदराबादची पाटी कोरीच

अबुधाबी: सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिंसची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर शुभमन गिलने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा सात विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमध्ये आपला पहिला विजय मिळवला.

हैदराबादला १४२ धावांवर रोखल्यानंतर कोलकाताला विजय मिळवण्यास फार प्रयत्न करावे लागले नाहीत. सलामीवीर शुभमन गिलने शानदार अर्धशतक करून मॅचविनिंग खेळी केली. त्याने सुरुवातीपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याच्या टोलेबाजीत तंत्रशुद्धता होती, त्यामुळे त्याला बाद करणे कठीण जात होते. दुसरा सलामीवीर सुनील नारायण बाद झाल्यावर गिलने नितीश राणासह संघाच्या विजयाची पायाभरणी केली. 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा आत्तापर्यंतच्या परंपरेत वॉर्नरने बदल केला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण अपेक्षाभंग झाल्याचे लगेचच त्याच्या लक्षात आले. वॉर्नर ३६ धावाच करू शकला. तर मनीष पांडे अर्धशतक केले. 
संक्षिप्त धावफलक ः हैदराबाद ः २० षटकांत ४ बाद १४२ (डेव्हिड वॉर्नर ३६ -३० चेंडू, २ चौकार, १ षटकार, मनिष पांडे ५१ -३८ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, साहा ३० -३१ चेंडू, १ चौकार, १ षटकार, कमिंस १९-१, रसेल १६-१)पराभूत वि. कोलकाता ः१८ षटकात ३ बाद १४५ (शुभमन गिल नाबाद ७० -६२ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, नीतिश राणा २६ -१३ चेंडू, ६ चौकार, इऑन मॉर्गन नाबाद ४२, २९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार). 

संबंधित बातम्या