आयपीएल २०२०:‘सुरक्षा कवच’ नियम कठीण, पण अनिवार्य - श्रेयस अय्यर

वृत्तसेवा
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘बायो बबल’ अर्थात सुरक्षा कवच त्याचे नियम पाळणे फारच आव्हानात्मक आहे; परंतु ते आवश्‍यकच आहे, असे मत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आणि मुंबईकर असलेल्या श्रेयस अय्यरने व्यक्त केले आहे.

शारजा: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘बायो बबल’ अर्थात सुरक्षा कवच त्याचे नियम पाळणे फारच आव्हानात्मक आहे; परंतु ते आवश्‍यकच आहे, असे मत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आणि मुंबईकर असलेल्या श्रेयस अय्यरने व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीचे सावट कायम असले तरी कठीण परिस्थितीत अनेक नियमांच्या चौकटी तयार करून आयपीएलचा घाट घालण्यात आला आहे. ५४ दिवस आणि तीन शहरात रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी जैव सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आयपीएलशी संबंधित प्रत्येकावर बंधने असणार आहेत.

अशा परिस्थितीत आपल्याला आयपीएल खेळावी लागेल असा विचार आम्ही कधीच केला नव्हता. माणूस म्हणून पदोपदी नियम पाळणे सोपे नाही. पण आयपीएल यशस्वी करायची असेल तर आम्हा सर्वांना या सुरक्षा कवचाचे पालन करणे अत्यावश्‍यक आहे, असे अय्यरने सांगितले. 

काय आहेत ‘सुरक्षा कवचा’चे प्रमुख नियम

  •  प्रत्येक खेळाडूची दर पाच दिवसांनी कोरोना चाचणी
  •  जर एखादा खेळाडू पॉझिटिव्ह असला तर त्याला १४ दिवसांचे विलगीकरण. 
  •  या विलगीकरणानंतर २४ तासांत आरटी पीसीआर या दोन चाचण्या अनिवार्य.
  •  सुरक्षा कवचामध्ये समावेश असलेल्यांव्यतिरिक्त कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश नाही.

संबंधित बातम्या