आयपीएल २०२०:: टीआरपीचा सलामीला विक्रमी ‘षटकार’

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

मुंबई-चेन्नई सामन्याला २० कोटी टीव्ही प्रेक्षक

दुबई: तब्बल सहा महिने भारतीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या प्रेक्षकांनी आयपीएलच्या सलमीलाच ‘षटकार’ ठोकला. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्याचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल २० कोटी प्रेक्षकांनी टीव्हीवरून हा सामना पाहिला असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली.

१९ तारखेला झालेल्या या सामन्याबाबत भारतातच नव्हे; तर क्रिकेटविश्‍वात कमालीची उत्सुकता होती. ‘बीएआरसी’च्या आकडेवारीनुसार २० कोटी प्रेक्षकांनी सलामीच्या सामन्याचा आस्वाद घेतला. जगभरात कोणत्याही लीगच्या सलामीला एवढी टीव्ही प्रेक्षकसंख्या मिळाली नव्हती. त्यामुळे हा विक्रम असल्याचे शहा यांनी ट्‌विटरवरून माहिती देताना म्हटले आहे.

संबंधित बातम्या