आयपीएल २०२०: ‘मुंबई एक्‍स्प्रेस’ यार्डातच की रुळावर?

‘मुंबई एक्‍स्प्रेस’ यार्डातच की रुळावर
‘मुंबई एक्‍स्प्रेस’ यार्डातच की रुळावर

अबुधाबी:  सलामीच्या सामन्यात ‘नाव मोठे लक्षण खोटे’ ठरलेल्या मुंबई इंडियन्ससमोर लगेचच उद्या ताकदवर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान उभे राहिले आहे. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात मुंबईने कोलकात्यावर चांगलेच वर्चस्व गाजवलेले असले, तरी अमिरातीतील इतिहास मात्र कोलकात्याच्या बाजूने आहे.
 
आयपीएलमध्ये मुंबईने सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवलेले असेल; परंतु ‘स्लो स्टार्टर’ म्हणून मुंबई संघाची ओळख आहे. अशातच चेन्नई संघाविरुद्धचा सलामीचा सामना गमावून मुंबईने ‘परंपरा’ कायम राखली. आत्मविश्‍वास परत मिळवण्यासाठी मुंबईला उद्या विजय आवश्‍यकच आहे.

कोलकत्यासाठी यंदाचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे त्यांचा पवित्रा सावध असेल; मात्र मुंबई संघाकडे एका सामन्याचा अनुभव आहे. 

मुंबई वि. कोलकाता

 दोघांतील यापूर्वीच्या लढतीत कोलकात्याचा ३४ धावांनी विजय
 मात्र त्यापूर्वीच्या आठ लढतीत मुंबईचा विजय
 हवामानाचा अंदाज ः सामन्याच्या वेळी तपमान ३२ ते ३५ अंश. सामना सुरू होताना वाऱ्याचा वेग जास्त. त्याचा फायदा गोलंदाजांना तसेच हवेत चेंडू फटकावणाऱ्या फलंदाजांनाही. पूर्ण स्वच्छ आकाश.
 खेळपट्टीचा अंदाज ः अबू धाबीची खेळपट्टी फिरकीसही साथ देण्याची शक्‍यता. त्यामुळे फलंदाजांचा कस. याच मैदानावर मुंबई - चेन्नई लढत झाली होती. 

बेजबाबदार फटकेबाजी

मुंबई संघात एकापेक्षा एक सरस आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले फलंदाज आहेत; परंतु चेन्नईविरुद्ध १ बाद ९० अशी सुरुवात केल्यानंतरही बेजबाबदार फटके मारून विकेट गमावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मानेही ही खंत व्यक्त केली होती. अबुधाबीची खेळपट्टी संथ आहे. उंच फटके मारताना सावधगिरी बाळगावी लागते. प्रामुख्याने हार्दिक पंड्यासारख्या फलंदाजाला उताविळपणावर मात करावी लागेल; तरच मुंबईला चांगल्या धावसंख्येची आशा बाळगता येईल. 

बुमराकडून निराशा

मुंबई संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याचे निष्णात असे जसप्रित बुमरा आणि ट्रेंट बोल्ट असे वेगवान गोलंदाज आहेत, सोबत ऑस्ट्रेलियाचा पॅटिन्सनही आहे; पण काही प्रमाणात बोल्टचा अपवाद वगळता बुमरा पूर्णतः अपयशी ठरला होता. 

जमेच्या बाजू

मुंबई ः रोहित शर्मा कोलकाताविरुद्ध हमखास यशस्वी ठरतो. डिकॉकला सापडलेला सूर.
कोलकाता ः समतोल संघ. मॉर्गनसह शुभमन गिल ,आंद्रे रसेल धोकादायक फलंदाज.

कमकवूत बाजू

मुंबई ः जसप्रित बुमराचे अपयश, राहुल चहर आणि कृणाल पंड्या यांच्यावरच फिरकीची मदार.
कोलकाता ः पहिल्या सामन्याचे दडपण येऊ शकते. खेळपट्टी संथ असल्याने टोलेबाजी सोपी नाही. 

यंदाच्या स्पर्धेत

मुंबई ः सलामीच्या सामन्यात पराभव
कोलकाता ः आज पहिलाच सामना

  • काय निर्णायक ठरू शकेल
  •   सुनील नारायणचा मुंबईने केलेला सामना
  •   जसप्रीत बुमराच्या भेदकतेचे यश
  •    मुंबईच्या विजयाची शक्‍यता ५४ टक्के

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com