आयपीएल २०२०: उंबरठा पार न करू शकल्याची खंत- मयांक अगरवाल

पीटीआय
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खडतर प्रयत्न करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले; परंतु हा उंबरठा पार करू शकलो नाही, याचे दुःख आहे, अशी खंत पंजाब संघाचा सालामीवीर मयांक अगरवालने व्यक्त केली.

दुबई:  दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खडतर प्रयत्न करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले; परंतु हा उंबरठा पार करू शकलो नाही, याचे दुःख आहे, अशी खंत पंजाब संघाचा सालामीवीर मयांक अगरवालने व्यक्त केली.

बरोबरी झालेल्या सामन्यात १५८ धावांचे आव्हान पार करताना पंजाबची ५ बाद ५५ अशी अवस्था झाली होती. या कठीण परिस्थितीतून मयांकने ८९ धावांची खेळी केली आणि संघाला १५७ धावांपर्यंत मजल मारून दिली होती; परंतु अखेरच्या तीन चेंडूंत एका धावेची गरज असताना तो बाद झाला.

हा दिवस फारच कठीण होता; तरीही काही चांगल्या गोष्टी घडल्या. आमचे पुनरागमन जबरदस्त होते. नव्या चेंडूवर आमच्या गोलंदाजांनी केलेला माराही अप्रतिम होता; परंतु विजयाची एक धाव आम्ही करू शकलो नाही, याचे दुःख आहे, असे अगरवाल म्हणाला.

‘त्या’ घटनेवर मयांकचे मौन
१५७ ही धावसंख्या आव्हानात्मक होती. त्यासाठी भागीदारी होणे महत्त्वाचे होते. नव्या चेंडूवर विकेट शाबूत ठेवल्या, तर आपण विजयाच्या जवळ जाऊ शकतो याची जाणीव होती, असे सांगणाऱ्या मयांकने अखेरच्या क्षणी घडलेल्या नाट्यावर बोलण्यास नकार दिला.  

मयांकने प्रतिस्पर्धी संघाच्या मार्कस स्टॉयनिसचे कौतूक केले. 

संबंधित बातम्या